Bajaj च्या IPO ने एका दिवसात केले पैसे दुप्पट! गुंतवणूकदार झाले मालामाल

Bajaj Housing Finance IPO Listing: प्रत्येक शेअर्सवर गुंतवणूकदाराला 80 रुपयांचा फायदा झाला. शेअरने 114 टक्के इतका भक्कम लिस्टिंग फायदा मिळवून दिला

Pravin Dabholkar | Updated: Sep 16, 2024, 01:29 PM IST
Bajaj च्या IPO ने एका दिवसात केले पैसे दुप्पट! गुंतवणूकदार झाले मालामाल title=
बजाजचे गुंतवणूकदार झाले मालामाल

Bajaj Housing Finance IPO Listing: बजाज हाऊसिंग फायनान्सच्या आयपीओची लिस्टिंग झाली आहे. या आयपीओने बाजारात लिस्ट होताच आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल बनवले आहे. सोमवारी शेअर बाजारामध्ये बजाज हाऊसिंग फायनान्सची लिस्टिंग झाली. या लिस्टिंगसोबत गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट झाले आहेत. बीएससी, एनएसई दोन्हीवर बजाज फायनान्सची लिस्टिंग 114.29 टक्के प्रमियमसह 150 रुपये इतकी झाली. 

बजाज हाऊसिंग फायनान्सच्या आयपीओबद्दल गुंतणूकदारांमध्ये खूप उत्साह पाहायला मिळत होता. हाच उत्साह लिस्टिंगच्यादिवशी देखील दिसून आला. 70 रुपये प्रति शेअरच्या लिस्टिंगवर गुंतवणूकदारांचा पैसा दुप्पट झाला. लिस्टिंगमध्येच या शेअरमध्ये तेजी पाहायला मिळाली. काही वेळातच बजाज हाऊसिंग फायनान्सचा शेअर 155 रुपयांच्या पलिकडे गेला.गुंतवणूकदारांच्या नजरेतून पाहायला गेलं तर त्यांचे पैसे एका दिवसात दुप्पटीहूनही जास्त झाले आहेत. 

150 रुपयांवर लिस्ट

प्रत्येक शेअर्सवर गुंतवणूकदाराला 80 रुपयांचा फायदा झाला. शेअरने 114 टक्के इतका भक्कम लिस्टिंग फायदा मिळवून दिला. आयपीओमध्ये ज्याचे अप्पर प्राइसबॅंड 70 रुपये होते. आता तो 150 रुपयांवर लिस्ट झाला. म्हणजेच ज्या गुंतवणूकदारांनी शेअरमध्ये पैसे गुंतवले होते, त्यांना 114.29 टक्के लिस्टिंग मिळाली.

 छोट्या गुंतवणूकदारांना प्रॉफीट बूक करण्याचा सल्ला 

या शेअर्सबद्दल मार्केट एक्सपर्टदेखील उत्साही दिसले. तज्ज्ञांच्यामते कंपनीचे बिझनेस मॉडेल खूप मजबूत आणि चांगले आहे. यासोबतच देशाच्या हाऊसिंग सेक्टरचे आऊटलूकदेखील खूप पॉझिटीव्ह आहे. शेअर लाँग टर्ममध्येदेखील चांगली कमाई करेल, ज्याचा गुंतवणूकदारांना फायदा मिळेल. दरम्यान छोट्या गुंतवणूकदारांना प्रॉफीट बूक करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.बजाज हाऊसिंग फायनान्स कंपनीने आयपीओच्या माध्यमातून 6560 कोटी रुपये गोळा करण्याचा प्लान केला होता. कंपनीला या आयपीओतून 64 टक्के सब्ससक्रिप्शन मिळाले. 

एका लॉटवर 17 हजाराचा फायदा 

रिटेल गुंतवणूकदारांना यात 214 शेअरच्या बदल्यात 17 हजार 980 रुपये गुंतवायचे होते. कोणाला एक लॉट मिळाला असेल तर त्याचे 14 हजार 980 रुपये आज 32 हजार 57 रुपये इतके झाले. म्हणजेच त्या गुंतवणूकदाराने एका दिवसात 17 हजार इतका प्रॉफीट कमावला. 

ग्रे मार्केटमध्ये याच्या लिस्टिंगचे संकेत 145 रुपये होते.जे प्राइस बॅण्डच्या तुलनेत 107 टक्के प्रिमियमचे संकेत देत होते. पण आयपीओने ग्रे मार्केट संकेतांपेक्षाही जास्त प्रिमियमसह मार्केटमध्ये एन्ट्री केली.