सोनं खरेदी करणाऱ्यांची मज्जाच मज्जा! एका आठवड्यात प्रति तोळा 2100 रुपयांचा नफा, का वाढले भाव?

Gold- Silver Price Today: आज पुन्हा एकदा सोनं-चांदीच्या दरात वाढ झाली आहे. दोन महिन्यांचा उच्चांकी भाव आज सोन्याचे गाठला आहे.

मानसी क्षीरसागर | Updated: Sep 16, 2024, 12:48 PM IST
सोनं खरेदी करणाऱ्यांची मज्जाच मज्जा! एका आठवड्यात प्रति तोळा 2100 रुपयांचा नफा, का वाढले भाव? title=
Gold silver price gets costlier today check 22 and 24 carat price maharashtra

Gold- Silver Price Today: आज तुम्हीदेखील सोनं खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आजचे सोन्या-चांदीचे दर तुम्हाला माहिती असणे गरजेचे आहे. सध्या देशात सणा-सुदीचे वातावरण आहे. पुढच्या महिन्यात दिवाळी आहे. त्यापूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. मागील आठवड्यापासून सोनं वधारलं आहे. सराफा बाजारात भाव वधारलेलेच असताना आता वायदे बाजारातही सोनं-चांदीच्या दरात तेजी दिसून येत आहे. मागील आठवड्यात सोनं 2100 तर चांदी 7,000 रुपयांची महागली आहे. तर आज सोमवार 16 सप्टेंबर रोजी  मौल्यवान धातुंमध्ये वाढ दिसत आहे. MCX वर सोनं 160 रुपयांनी वाढलं आहे. 24 कॅरेट सोन्याची किंमत आज प्रतितोळा 75,050 रुपयांवर पोहोचली आहे. 

आज चांदीच्या दरातही जवळपास 1 हजार रुपयांनी वाढ झाली आहे. आज चांदी प्रतिकिलो 90,135 रुपयांवर पोहोचली आहे. म्हणजेच चांदी वायदे बाजारात पुन्हा एकदा 90,000 हजारां पार गेली आहे. शुक्रवारी चांदी 89,180 रुपयांवर स्थिरावली होती. जागतिक बाजारपेठ आणि स्थानिक मागणी यामुळं सोन्याचे दराने दोन महिन्यातील उच्चांक गाठला आहे. चांदीच्या किंमतीतही सलग चौथ्यांदा व्यवहारात तेजी आली आहे. 

आंतरराष्ट्रीय बाजारातील मजबूत संकेतांमुळे सोन्याच्या दरात मोठी वाढ झाल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. यूएस फेडरल रिझर्व्ह पुढील आठवड्यात व्याजदरात कपात करेल, ज्यामुळे सोन्याचे भाव विक्रमी उच्चांकावर पोहोचतील. तसंच, लग्नसराई आणि सणांमुळंही खरेदी वाढत असल्याने सोन्याच्या दरात वाढ झाली आहे, अशी प्रतिक्रिया व्यापाऱ्यांनी दिली आहे. 

आज काय आहेत सोन्याचे भाव?

ग्रॅम              सोनं           किंमत
10 ग्रॅम     22 कॅरेट  68,800 रुपये
10 ग्रॅम     24 कॅरेट  75,050 रुपये
 10 ग्रॅम    18 कॅरेट  56,290 रुपये

ग्रॅम              सोनं           किंमत
1 ग्रॅम     22 कॅरेट   6,880 रुपये
1 ग्रॅम     24 कॅरेट   7, 505 रुपये
1 ग्रॅम    18 कॅरेट    5, 629 रुपये

ग्रॅम              सोनं           किंमत
8 ग्रॅम     22 कॅरेट   55, 040 रुपये
8 ग्रॅम     24 कॅरेट   60, 040 रुपये
8 ग्रॅम    18 कॅरेट    45, 032 रुपये

मुंबई - पुण्यात कसे असतील सोन्याचे दर?

22 कॅरेट- 68,800 रुपये
24 कॅरेट- 75,050 रुपये
18 कॅरेट- 56,290 रुपये