लखनऊमध्ये इको फ्रेंडली अंदाजात बकरी ईद

आज देशभरात बकरी ईदचा उत्साह आहे. 

Updated: Aug 22, 2018, 10:11 AM IST
लखनऊमध्ये इको फ्रेंडली अंदाजात बकरी ईद  title=

उत्तर प्रदेश : आज देशभरात बकरी ईदचा उत्साह आहे. बकर्‍याचा बळी देऊन हा सण साजरा केला जातो. मात्र प्राण्यांचा असा बळी देणं हा वादाचा मुद्दा झाला आहे. यंदा उत्तरप्रदेशात मात्र यावर एक इको फ्रेंडली पद्धतीने तोडगा काढण्यात आला आहे. 

इको फ्रेंडली पद्धतीने बकरी ईद  

लखनऊमध्ये काही मुस्लीम बांधवांनी पारंपारिक पद्धतीने बकरी ईद साजरी करण्यापेक्षा बकरीच्या चेहर्‍याचा केक कापून प्रातिनिधिक स्वरूपात बकरी ईद साजरी केली आहे. 

बेकरीच्या मालकाचं आवाहन 

प्राण्याचा बळी देणं उचित वाटत नसल्याने यंदापासून बकरी ईद प्रातिनिधिक स्वरूपात साजरी करण्यासाठी त्याच्या चित्राचा केक कापून बकरी ईद साजरी करण्याचं आवाहन लखनऊच्या एका बेकरी मालकाने केलं आहे.  

 

अटल बिहारींना आदरांजली 

माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींचे काही दिवसांपूर्वी निधन झाले. त्याच्या निधनानंतर सात दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे.  अटल बिहारींच्या निधनानंतर आपला राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरवला आहे. त्यामुळे मुस्लीम बांधवांनाही साधेपणाने यंदा ईद साजरी करण्याचं आवाहन केल्याचे शिया मौलवी सैफ अब्बास यांनी  सांगितले आहे.