BREAKING : बैलगाडा शर्यतवरील बंदी उठणार? सुप्रीम कोर्टात उद्या होणार सुनावणी

बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठणार का याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.

Updated: Dec 15, 2021, 04:26 PM IST
BREAKING : बैलगाडा शर्यतवरील बंदी उठणार? सुप्रीम कोर्टात उद्या होणार सुनावणी title=
संग्रहित फोटो

Bullock Cart Race : बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवण्यासाठी राज्य सरकारनं सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. यावर आता उद्या सुनावणी होणार आहे. आज या याचिकेवर युक्तीवाद झाला. यानंतर आता उद्या सुनावणी होणार आहे.

२०१७ साली मुंबई हायकोर्टाने बैलगाडा शर्यतींवर बंदी घातली होती. याला राज्य सरकारने न्यायालयात आव्हान दिलं होतं. 

शर्यतीत बैलांना काठीने, चाबकाने अमानुष मारलं जातं, बॅटरीचा शॉक दिला जातो असे बैलांवर अनेक अत्याचार केले जातात, अशी तक्रार करत प्राणीमित्रांनी बैलगाडा शर्यतीवर बंदी घालण्याची मागणी केली होती. यानंतर राज्यात बैलगाडा शर्यतीवर बंदी घालण्यात आली होती.

पण बैलगाडा पुन्हा सुरु कराव्यात अशाही अनेक मागण्या करण्यात येत आहेत. बैलगाडा शर्यत हा शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. गावच्या जत्रांमध्ये बैलगाडा शर्यतीचं आकर्षण असतं, त्यातून सर्वसामन्य शेतकऱ्यांपासून व्यावसायिकांनाही रोजगार उपलब्ध होतो.  बैलगाडा शर्यत ही महाराष्ट्राची परंपरा असल्याने बैलगाडा शर्यत सुरु करावी अशा मागणीने जोर धरला होता.