मुंबई : देशभरात दिवाळीला सुरुवात झाली आहे. पण जर तुमचं बँकेशी संबंधित काही काम असेल तर तुम्हाला 5 दिवस थांबावं लागणार आहे. कारण आजपासून अनेक राज्यांमध्ये बँका 5 दिवस बंद राहणार आहेत. त्यामुळे जर पैशांची गरज लागणार असेल तर आजच एटीएममधून पैसे काढून ठेवावे.
आज लक्ष्मीपूजन, 8 नोव्हेंबरला पाडवा आणि 9 नोव्हेंबरला भाऊबीज असली तर बँका सुरु असणार आहे. यानंतर 10 नोव्हेंबरला दूसरा शनिवार असल्याने बँक बंद राहणार नाही. 11 नोव्हेंबरला रविवार असल्याने बँकांना सुट्टी आहे. त्यामुळे सोमवारी तुम्हाला बँकेचे व्यवहार करता येणार आहे. दिवाळीनिमित्त बँकांना सुट्टी असल्याने पैशांचा व्यवहार करता येणार नाही. सुट्टी असल्याने एटीएममध्ये देखील पैशांची कमतरता भासू शकते. त्यामुळे जर पैशांची गरज भासणार असेल तर आजच पैशे काढून घ्या.
उत्तर प्रदेशमध्ये 7, 8 आणि 9 नोव्हेंबरला बँका बंद असणार आहेत. 10 नोव्हेंबरला दूसरा शनिवार आणि 11 नोव्हेंबरला रविवार यामुळे बँका बंद राहणार आहे. उत्तर प्रदेशमध्ये 5 दिवसासाठी बँका बंद असणार आहेत.
बिहारमध्ये 7,10,11 12 नोव्हेंबरला बँका बंद असणार आहेत. त्यानंतर 13-14 नोव्हेंबरला छठ पुजेमुळे बँका बंद राहणार आहेत. राजस्थानमध्ये 7 आणि 8 नोव्हेंबरला बँका बंद राहणार असून 9 नोव्हेंबरला बँका सुरु असणार आहेत. त्यानंतर 10 आणि 11 नोव्हेंबरला पुन्हा बँका बंद असणार आहेत.