मुंबई : भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांतील आंतरराष्ट्रीय सीमेवरही दिवाळीचा उत्साह पाहायला मिळाला. अटारी येथी प्रसिद्ध ट्रांझिट गेटवर हा सण साजरा करण्यात आला. यावेळी दोन्ही देशांच्या सैनिकांच्याही चेहऱ्यांवर आनंद पाहायला मिळत होता.
भारतातर्फे बीएसएफ आणि पाकिस्तानतर्फे पाकिस्तान रेंजर्सच्या सैन्यदल अधिकाऱ्यांनी एकमेकांना मिठाई देत या सणाच्या शुभेच्छा दिल्या.
दोन्ही देशांच्या सीमेवर असणाऱ्या सैन्यदल अधिकाऱ्यांनी हस्तांदोलन करत एकमेकांना या उज्वल प्रकाशपर्वाच्या शुभेच्छा दिल्या.
सोशल मीडियावर या दोन्ही देशांच्या सैन्यदलातील हे क्षण अनेकांचीच मनं जिंकून गेली आहेत.
Punjab: Border Security Force and Pakistan Rangers exchanged sweets at Attari-Wagah border today, on the occasion of #Diwali. pic.twitter.com/CuO8VG7CfL
— ANI (@ANI) November 7, 2018
भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांक़डून नेहमीच काही महत्त्वाच्या सणांच्या निमित्ताने प्रजासत्ताक दिन, स्वातंत्र्य दिन, दिवाळी, ईद अशा दिवशी दोन्ही देशांमध्ये हे सलोख्याचे क्षण पाहायला मिळतात