सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात खरंच बँका ५ दिवस बंद राहणार? पाहा काय आहे सत्य

सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये लागोपाठ ५ दिवस बँकांना सुट्टी असेल, असे मेसेज सोशल नेटवर्किंगवर फिरत आहेत. 

Updated: Aug 30, 2018, 09:23 PM IST
सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात खरंच बँका ५ दिवस बंद राहणार? पाहा काय आहे सत्य title=

मुंबई : सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये लागोपाठ ५ दिवस बँकांना सुट्टी असेल, असे मेसेज सोशल नेटवर्किंगवर फिरत आहेत. पण हे मेसेज खोटं असल्याचं आता स्पष्ट झालं आहे. १ सप्टेंबर ते ५ सप्टेंबरपर्यंत बँका बंद नसतील. १ सप्टेंबरला शनिवार, २ सप्टेंबरला रविवार, ३ सप्टेंबरला श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि ४-५ सप्टेंबरला आरबीयच्या कर्मचाऱ्यांचा संप असल्यामुळे बँका बंद असतील असा दावा या मेसेजमध्ये करण्यात आला होता.

१ सप्टेंबर हा महिन्याचा पहिला शनिवार आहे. पहिल्या शनिवारी नाही तर दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बँका बंद असतात. त्यामुळे १ सप्टेंबरला बँका सुरु असतील. २ सप्टेंबरला रविवार असल्यामुळे आणि ३ सप्टेंबरला जन्माष्टमी असल्यामुळे बँका बंद असतील. ४ आणि ५ सप्टेंबरला बँका सुरळीत सुरू राहणार आहेत.

बँकांना सुट्टी जरी असली तरी सुट्टीच्या आधी एटीएममध्ये आवश्यक तेवढे पैसे टाकले जातात. त्यामुळे ग्राहकांना होणारा त्रास कमी होतो, अशी माहिती जाणकारांनी दिली आहे.