नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील बाराबंकी येथील इयत्ता १२वीत शिकणारा एक विद्यार्थी अवघ्या काही मिनीटांतच कोरडपती झाला. त्याच्या मोबाईलवर बॅंकेचा तसा संदेश धडकला आणि त्यालाच नव्हे तर, त्याच्या कुटुंबियांनाही धक्का बसला. या विद्यार्थ्याच्या मोबाईलमध्ये आलेल्या संदेशात त्याच्या खात्यावर चक्क ५.५५ कोटी रूपये ट्रान्स्फर झाल्याचे दाखवत होते.
मेसेज पाहून या विद्यार्थ्याच्या घरच्यांनाही विश्वास बसला नाही. या प्रकारामुळे गोंधळलेल्या विद्यार्थी आणि त्याच्या पालकांनी बॅंकेत धाव घेतली. बॅंकेत जाऊन त्यांनी घडला प्रकार कथन केला. बॅंक अधिकाऱ्यांनी केलेल्या तपासात या माहितीत तथ्य आढलळे. त्यामुळे अधिकाऱ्यांनी तातडीने कारवाई करत या विद्यार्थ्याचे खाते गोठवले.
प्राप्त माहितीनुसार, बाराबंकी येथील सेंट्रल अॅकेडमी येथे शिकणाऱ्या केशवर शर्मा नावाच्या विद्यार्थ्याचे स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या सट्टी बाजार शाखेत खाते आहे. हा विद्यार्थी अल्पवयीन असल्यामुळे या खात्याचे सर्वाधिकार त्याचे वडील नरेंद्र शर्मा यांच्याकडे आहेत. तसेच, हे खाते अगदीच साधे असल्यामुळे या खात्याचे कार्ड किंवा चेकबूक यापैकी काहीच नाही. तसेच, या खात्यावर जर पैसे भरायचे असतील तर त्याचेही अधिकार नरेंद्र शर्मा यांनाच भरता येतात.
प्रसारमाध्यमांतून आलेले वृत्त असे की, केशव याला आपल्या कॉलेजमधून शिक्षणासाठी शिकवणी सुरू करायची होती. त्यासाठी त्याच्या वडिलांनी त्याला बॅंकेतील खात्यावरची शिल्लख तपासायला सांगितली. तेव्हा मोबाईलवरून शिल्लख तपासली असता, आलेल्या संदेशातील रक्कम पाहून विद्यार्थ्याला धक्का बसला. तर, त्याचे वडीलही चाट पडले.
प्रसारमाध्यमांतून आलेल्या वृत्तानुसार, बॅंकेने या विद्यार्थ्याचे खाते गोठवले आहे. मुळात ही रक्कम बॅंकेच्या चुकीमुळे या खात्यावर वर्ग झाली. आता हे खाते गोठवल्यामुले या खात्यावर असलेली एक लाख रूपयांची रक्कम या विद्यार्थ्याच्या वडिलांना काढता येत नाही. त्यामुळे बॅंकेच्या चुकीची शिक्षा खातेधारकाला भोगावी लागत असल्याचे चित्र आहे.