'या' पोस्टमुळे तुम्ही अडकाल कायद्याच्या कचाट्यात

सोशल मीडियावर बेसावधपण पोस्ट करणाऱ्यांना आता यापुढे संभाळून रहावे लागणार आहे. कारण आपल्या पैशाचे, मज्जा-मस्तीचे ओंघाळवाणे प्रदर्शन करणाऱ्यांना हे महागात पडू शकते.  फेसबुक किंवा इन्स्टाग्रामवरील तुमच्या फोटोंवर आता आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांचीही करडी नजर असणार आहे.

Pravin.Dabholkar Pravin Dabholkar | Updated: Sep 11, 2017, 09:13 AM IST
 'या' पोस्टमुळे तुम्ही अडकाल कायद्याच्या कचाट्यात  title=

नवी दिल्ली : सोशल मीडियावर बेसावधपण पोस्ट करणाऱ्यांना आता यापुढे संभाळून रहावे लागणार आहे. कारण आपल्या पैशाचे, मज्जा-मस्तीचे ओंघाळवाणे प्रदर्शन करणाऱ्यांना हे महागात पडू शकते.  फेसबुक किंवा इन्स्टाग्रामवरील तुमच्या फोटोंवर आता आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांचीही करडी नजर असणार आहे.

 प्रोजेक्ट इनसाइट 

काळ्या पैसा बाहेर काढण्यासाठी आयकर विभागाने कंबर कसली आहे. त्यासाठी 'प्रोजेक्ट इनसाइट' नावाने मोहीम हाती घेतली असून पुढील महिन्यापासून याची अंमलबजावणी होणार आहे. या विशेष मोहिमेंतर्गत आयकर विभाग संबंधित व्यक्तीची सर्व माहिती आणि सोशल नेटवर्किंग साइटवरील माहिती पडताळून त्याद्वारे संबंधित व्यक्तीचा खर्च आणि घोषित उत्पन्नामधील फरक तपासून पाहणार आहेत. त्यामुळे काळा पैसा बाळगणारे सतर्क होण्याच्या तयारीत आहेत. 

पैशांवर अंकुश 

प्रोजेक्ट इनसाइटसाठी एक प्लॅटफॉर्म पुढील महिन्यात सुरु करण्यात येणार आहे. आयकर विभाग टॅक्सची व्याप्ती वाढविण्यासाठी प्रोजेक्ट इनसाइट योजना सुरु करत आहे. महागड्या वस्तूंची देवाण घेवाण आणि काळ्या पैशांवर अंकुश लावण्यासाठी याची मदत होणार आहे. 

हक्काच उल्लंघन नाही 

दरम्यान या नव्या नियमामुळे सर्वसामान्य व्यक्तीच्या मूलभूत हक्कांचं उल्लंघन होणार नाही. प्रत्येकाच्या मागे चौकशीचा तगादा लागणार नाही, असं आयकर विभागातील अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.