Melasma Treatment: सुंदर दिसणं प्रत्येकालाच आवडत, यासाठी आपण बरेच प्रयत्न करत असतोच पण आजकाल आयुष्य इतकं धावपळीचं झालं आहे कि स्वतःकडे लक्ष द्यायला आपल्याकडे पुरेसा वेळीसुद्धा नसतो. कामाच्या बदलत्या वेळा हवेतील प्रदूषण खाण्यापिण्याच्या अनियमित वेळा या सगळ्यांचा परिणाम आपल्या त्वचेवर फार पटकन दिसून येतो. (Beauty treatment)
आपला चेहरा हीच आपली खरी ओळख असते त्यामुळे चेहऱ्यावर पिंपल्स (pimples) आले , काही डाग आले तर आपण आत्मविश्वास हरवून बसतो. चारचौघात जाताना आपण थोडासा बिचकतो कचरतो.
आणखी वाचा : kitchen tips: तवा काळा पडलाय ? वापरा या टिप्स चमकेल नव्यासारखा...
अनेक जण असे आहेत ज्यांना चेहऱ्यावर वांग (melasma on face skin) येतात. या त्रासामुळे चारचौघात वावरणं आपण कमी करतो या वांगच्या डागांवर बरेच उपाय केले जातात मात्र, त्यावर काहीच फरक पडत नाही..पण आज असे काही उपाय सांगणार आहे ज्यामुळे तुमची वांग आणि त्याचे डाग यांची समस्या कायमची जाणार आहे. (Beauty tips how to remove melasma treatment at home hacks)
वांगच्या समस्येपासून सुटका करण्याचे काही घरघुती आणि रामबाण उपाय (How to reduce pigmentation from the skin know remedies)
वांग म्हणजे नेमकं काय ?
वांग एक अशी समस्या आहे ज्यामुळे चेहऱ्याच्या त्वचेत असमानता दिसते त्वचेत रंगद्रव्य निर्माण करणाऱ्या काही पेशी असतात त्यामुळे आपल्या त्वचेला रंग प्राप्त होतो. ज्याला मेलानोसाईट्स असं म्हणतात. जेव्हा मेलानोसाईट्स प्रभावित होतात तेव्हा त्वचेतील काही भागात जास्त प्रमाणात मेलॅनिनची (melalin in skin) निर्मिती होते आणि त्यामुळे त्वचेचा काही भाग जास्त काळपट आणि काही भाग वेगळा दिसू लागतो. आणि यालाच वांग येणे असं म्हटलं जात
उपाय
वांग पडलेला चेहरा फारच खराब दिसू लागतो यावर अनेक उपाय अनेक क्रीम्स बाजारात उपलब्ध आहेत पण बऱ्याचदा त्याचा काहीच परिणाम होत नाही अख्या वेळी काय करायच असा प्रश्न आपल्यासमोर उभा राहतो. पण आता टेन्शन घेऊ नका. काही घरगुती आणि सोपे उपाय आहेत ते वापरून तुम्ही यापासून कायमची मुक्ती मिळवू शकता.
* लिंबू (lemon)
वांगच्या समस्येवर लिंबू हा रामबाण उपाय समजला जातो. यासाठी मुंबाचा रस घ्या यात मध घाला आणि एकत्र करून घ्या. आता हे मिश्रम जिथे वांग पडले आहेत तिथे लावा १५ मिनिटांनी कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ करा. आणि तोपर्यन्त फरक पडत नाही तोपर्यंत रोज हे मिश्रण लावत जा.
* बटाटा (potato)
यासाठी एक बटाटा घ्या तो अर्धा कापून घ्या, त्यावर पाण्याचे काही थेंब टाका आणि आता हा बटाटा वांग आलेल्या जागेवर चोळा ,मग कोमट पाण्याने धुवून टाका असे महिन्यातून २-३ वेळा करा.
* कोरफड (aloe vera)
एका वाटीत कोरफडीचा गर (aloe vera pulp) काढून घ्या यात मध मिसळा आणि 10 मिनिट हे मिश्रण सेट होऊद्या यानंतर चेहऱ्यावर हे मिश्रण लावा २० मिनिट राहू द्या सुकल्यावर चेहरा कोमट पाण्याने धुवून टाका हा उपाय आठवड्यातून २ वेळा करा याचा नक्कीच फरक पडेल.
* दही (curd)
दह्यामध्ये अँटी एजिंग (anti aging) गुणधर्म असतात तुम्ही नुसतं दही घेऊन ते चेहऱ्यावर लावलात तर याचा नक्कीच काही दिवसात फरक पडताना दिसेल.
* केळ (banana)
केळ कुस्करून घ्या. त्यात दूध आणि मध घाला. हे मिश्रण एकजीव करून घ्या आणि वांग आलेल्या भागावर लावा. ३० मिनिट राहू देऊन चेहरा कोमट पाण्याने धुवून घ्या.
चला तर मग हे उपाय करा आणि सुंदर तजेलदार त्वचा मिळवा.