मुंबई : आपल्या कधी कुठे बाहेर जायचं असेल तर आपण टॅक्सी किंवा रिक्षाच्या पर्यायाकडे वळतो. परंतु बऱ्याचदा असे घडते की, रिक्षा किंवा टॅक्सीवाले आपले वाहन खाली घेऊन जात असले तरी थांबत नाहीत किंवा आपण जेव्हा त्यांना ठिकाण सांगतो, तेव्हा ते भाडं नाकारतात. जेव्हा हे लोकं भाडं नाकारतात, तेव्हा बऱ्याचदा आपल्याला त्यांचा राग येतो आणि आपण त्यांना रागाच्या भरात बऱ्याचदा अपशब्द वारतो.
परंतु आपल्या मनात हा नेहमी प्रश्न येतो की, ते असं का करतात? त्यांना भाडं नको असतं का? ते भाडं मिळवण्यासाठी तर हे सगळं करतात. मग भांडं का नाकरतात?
तर यामागीत आपली कहाणी एका ऑटो चालकानं मांडली आहे, जी खरोखरच खुप भावुक करुन टाकणारी आहे.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुकवरती 'अंधेरी वेस्ट मीम्स फेसबुक पेज'वर ऑटोवाल्याशी संबंधीत एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे. ज्यामध्ये या ऑटोवाल्याने आपली कहाणी सांगितली आहे.
या ऑटो चालकानं पोस्टमध्ये सांगितलं की, नालासोपारा येथील एका चाळीत हा चालक तीन लोकांसह राहतो. त्याचे भाडे महिन्याला 1000 रुपये आहे. त्याने सांगितले की, तो कधी कधी रात्रभर काम करतो. ते रोज रात्री साडेआठ वाजता लोकल ट्रेनने मालाड पश्चिमेला पोहोचतात. यानंतर दररोज 500 रुपये वेगळे भाडे देऊन तो ऑटो भाड्यानं घेतो. दररोज एक व्यक्ती सकाळी 9 ते रात्री 9 पर्यंत ऑटो चालवते. यानंतर दुसरा व्यक्ती रात्री 9 ते सकाळी 9 वाजेपर्यंत ऑटो चालवतो.
या व्यक्तीने सांगितले की, 'मी दररोज व्यावसायिक क्षेत्रे आणि रेल्वे स्टेशनजवळ ऑटो चालवतो. दररोज 1 हजार 500 ते 2 हजार कमाई होते. त्यापैकी 200 ते 300 एलपीजीसाठी जातात. 500 रुपये ऑटोचे भाडं. त्यामुळे दररोज 600 ते 1 हजार रुपयांपर्यंत बचत होते.
यानंतर तो म्हणतो, मी जर सकाळी साडेआठ वाजता अंधेरीला असेल आणि मला माझ्या मालका जवळ मलाडला नऊ वाजता पोहोचायचे आहे. एखादा ग्राहक भेटला आणि तो मला म्हणाला की, मला वांद्र्याला जायचं आहे. तर त्यासाठी मला युटर्न मारावा लागण. ज्यामुळे मला माझ्या मालका पर्यंत पोहोचायला उशीर होणार आणि मालक माझ्यावरती चिढणार म्हणून मला नाईलाजानं भाडं नाकारावं लागतं.
ऑटो चालक पुढे म्हणाला, "कधी-कधी मी असं केल्यानं लोकांना राग येतो, मला देखील हे बरोबर वाटत नाही. पण मी काहीही करु शकत नाही. मुंबईत दोन लाख ऑटोवाले आहेत. मला खात्री आहे की कोणीतरी तुम्हाला नक्कीच घरी घेऊन जाईल. थोडा धीर धरा."