3 वर्षापूर्वी मृत्यू झालेल्या आईचा मृतदेह मुलाने ठेवला फ्रीजमध्ये

महानगरांमध्ये चार भिंतीत समाजाशी असलेलं नातं दिवसेंदिवस कमी होत असल्याच समोर आलं आहे. मुलाकडूनच आईप्रती घडलेली घटना ही अतिशय धक्कादायक आहे. 3 वर्षांपूर्वी मृत्यू झालेल्या आईचा मृतदेह मुलाने आपल्या फ्रिजमध्ये ठेवल्याची धक्कादायक घटना घडली. 

Dakshata Thasale Updated: Apr 5, 2018, 12:44 PM IST
3 वर्षापूर्वी मृत्यू झालेल्या आईचा मृतदेह मुलाने ठेवला फ्रीजमध्ये

कोलकाता : महानगरांमध्ये चार भिंतीत समाजाशी असलेलं नातं दिवसेंदिवस कमी होत असल्याच समोर आलं आहे. मुलाकडूनच आईप्रती घडलेली घटना ही अतिशय धक्कादायक आहे. 3 वर्षांपूर्वी मृत्यू झालेल्या आईचा मृतदेह मुलाने आपल्या फ्रिजमध्ये ठेवल्याची धक्कादायक घटना घडली. 

या प्रकरणातील आई 85 वर्षाची असून बीना मजूमदार असं त्या मृत महिलेचं नाव आहे. तर 45 वर्षाचा सुब्रत मजुमदार असं त्या मुलाचं नाव आहे. घरातील फ्रीजमध्ये सुब्रतने आपल्या आईचा मृतदेह ठेवला होता. हा आरोपी मुलगा फूड कॉरपोरेशन ऑफ इंडिया येथे काम करत आहे. 

गुरूवारी सकाळी दुर्गंध आल्यानंतर स्थानिक लोकांनी पोलिसांना याची माहिती दिली. यानंतर पोलिसांची टीम घटनास्थळी पोहोचली. घराची छडती घेताना पोलिसांना देखील अतीप्रमाणात दुर्गंध येत होता. तेव्हा त्यांना घरातील फ्रीजमध्ये वृद्ध महिलेचा मृतदेह सापडला. 

या प्रकरणानंतर शेजाऱ्यांचा दावा आहे की, तब्बल 3 वर्ष त्यांनी या महिलेला घराबाहेर पाहिलेलं नाही. या प्रकरणाच्या चौकशीकरता मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतं आहे. हा मुलगा मानिसक रूग्ण असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. आईच्या मृत्यूची घटना त्याला धक्का देणारी ठरली आणि त्यानंतर त्याने आईचा मृतदेहावर अंत्यसंस्कार केले नाहीत.