'बेशरम रंग' गाण्यावर तरूणाचा भन्नाट डान्स, Video होतोय व्हायरल

Besharam Rang : सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओत 'बेशरम रंग' (Besharam Rang) या गाण्यावर काही मुलं जबरदस्त डान्स करत असल्याचं पाहायला मिळत आहे. 

Updated: Dec 15, 2022, 09:21 PM IST
'बेशरम रंग' गाण्यावर तरूणाचा भन्नाट डान्स, Video होतोय व्हायरल title=

Besharam Rang : बॉलिवूडमध्ये सध्या एकाच गाण्याची चर्चा आहे. हे गाणे म्हणजे पठाण चित्रपटातील 'बेशरम रंग' (Besharam Rang) आहे. या गाण्यातील दिपिकाच्या बोल्डनेसने सर्वच हद्द पार केली.त्यातच आता हा चित्रपट भगव्या बिकिनीवरून वादात सापडताना दिसत आहे. असे सर्व असताना आता या गाण्यावरून सोशल मीडियावर रिल्स बनत आहेत.अशीच एक रिल्स समोर आली आहे, ही रिल्स पाहून तुम्हीही पोट धरून हसाल. 

व्हिडिओत काय? 

सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओत 'बेशरम रंग' (Besharam Rang) या गाण्यावर काही मुलं जबरदस्त डान्स करत असल्याचं पाहायला मिळत आहे. त्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये काही मुले दिपिकाच्या (Dipika Padukon) डान्स मूव्हची कॉपी करताना दिसत आहेत. हे डान्स मुव्हस पाहून अनेकांना हसू आवरता येत नाही आहेत. विशेष म्हणजे हे व्हिडिओ केवळ मनोरंजनाच्या उद्देशाने बनवले आहेत. या व्हिडिओवर लोकांनी अनेक कमेंट्सही केल्या आहेत.

दरम्यान @DeepikaBhardwaj नावाच्या ट्विटर यूजरने हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत 3 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तसेच या व्हिडिओवर अनेक युझर्स भन्नाट कमेंट करत आहेत. या व्हिडिओवर एका यूजरने लिहिले आहे, तो दीपिकापेक्षा चांगला डान्स करू शकतो. त्याचवेळी आणखी एका युजरने लिहिले आहे, पुरुष स्त्रीपेक्षा कमी नसतो.

पठाण (pathan) चित्रपटातील 'बेशरम रंग' (Besharam Rang) या पहिल्या गाण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर आला आहे. हे गाणे आतापर्यंत 46 लाख लोकांनी पाहिले आहे. या गाण्यावरून देशभरात अनेक वादही होत आहेत.