Best Pick | सह्याद्री इंडस्ट्रीजचा शेअर ठरतोय गुंतवणूकदारांचे आकर्षण; जाणून घ्या विशेष कारण

शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवण्याआधी संबधित कंपनीविषयी सविस्तर माहिती घेणे गरजेचे असते. गुंतवणूक करण्याआधी रिस्क कॅल्कुलेशनही महत्वाचे ठरते.

Updated: Sep 18, 2021, 01:07 PM IST
Best Pick | सह्याद्री इंडस्ट्रीजचा शेअर ठरतोय गुंतवणूकदारांचे आकर्षण; जाणून घ्या विशेष कारण title=

मुंबई : शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवण्याआधी संबधित कंपनीविषयी सविस्तर माहिती घेणे गरजेचे असते. गुंतवणूक करण्याआधी रिस्क कॅल्कुलेशनही महत्वाचे ठरते. शेअर बाजार आणि संबधित शेअरची चाल ओळखून गुंतवणूक केल्यास नक्कीच चांगला परतावा मिळतो.

मार्केट एक्सपर्ट संदीप जैन यांनी एक मजबूत शेअरची खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. जैन यांनी म्हटले की,  Sahyadri Industries मध्ये गुंतवणूक केल्यास चांगला रिटर्न मिळू शकतो. 

कंपनीबाबत 

ही एक जुनी कंपनी आहे. कंपनीची स्थापना 1974 साली झाली होती. कंपनीचे प्रोडक्ट लोकप्रिय आहेत. स्वस्तिक नावाने सह्याद्रीचे ब्रॅंड ओळखले जाते. सरकारच्या वतीने अफोर्डेबल हाउसिंग आणि वेअर हाउसिंगवर फोकस केले जात आहे. त्यामुळे कंपनीला फायदा होणार आहे. विशेषतः महाराष्ट्रातील ग्रामीण परिसरात कंपनीच्या प्रोडक्टची मागणी चांगली आहे.

फंडामेंटल्स

कंपनीवर सध्या 42 कोटींचे कर्ज होते. मागील 30 वर्षांच्या प्रॉफिटचा सीएजीआर (Compound annual growth rate)40 टक्के आहे. मागील 5 वर्षाचा सीएजीआर 50 टक्के आहे. कंपनीची मार्केट कॅप 600 ते 700 कोटींची आहे. कंपनीचे फंडामेंटल्स मजबूत आहेत. 

कंपनीचा नफा जून 2020 मध्ये 24 कोटी तर जून 2021 मध्ये 33 कोटी राहिला आहे. कंपनीच्या प्रमोटर्सकडे कंपनीची 67 टक्के हिस्सेदारी आहे. सह्याद्री इंडस्ट्रीजचे 3 हजार डिस्ट्रिब्युटर्सचे नेटवर्क आहे.

खरेदीचा सल्ला
CMP 734 
TARGET 850