मुंबईकरांसाठी मोठी बातमी! पश्चिम रेल्वेच्या वेळापत्रकात मोठे बदल, वाचा नवीन TimeTable

Mumbai Local Train TimeTable: मुंबई लोकलमधून प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. 

मानसी क्षीरसागर | Updated: Dec 17, 2024, 03:27 PM IST
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! पश्चिम रेल्वेच्या वेळापत्रकात मोठे बदल, वाचा नवीन TimeTable title=
mumbai local train update western railway announces temporary changes to timetable

Mumbai Local Train TimeTable: पश्चिम रेल्वेवरुन प्रवास करणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकलच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. त्यामुळं आता प्रवाशांना हे वेळापत्रक पाहूनच प्रवास करावा लागणार आहे. पश्चिम रेल्वेने काही निवडक लोकल सेवांच्या वेळापत्रकात बदल केला आहे. 16 डिसेंबरपासून हे बदल तात्पुरत्या स्वरुपात लागू करण्यात आले आहेत. (Mumbai Local Train News)

पश्चिम रेल्वेने काही लोकल गाड्यांच्या वेळेत आणि थांब्यांमध्ये तात्पुरता बदल करण्यात आला आहे. पश्चिम रेल्वेच्या या बदललेल्या वेळापत्रकानुसार अंधेरी-विरार लोकल सकाळी 6.49 वाजता भाईंदरपर्यंत थांबेल. नालासोपारा लोकल भाईंदरहून धावेल. या दोन्ही लोकल 15 डब्यांच्या असणार असून चर्चगेट ते मुंबई सेंट्रल पर्यंत जलद गतीने धावणार आहेत. 

पश्चिम रेल्वेनुसार लोकल ट्रेन क्रमांक 92019 अंधेरी-विरार (6:49)ही भाईंदरपर्यंत धावणार आहे. तर गाडी क्रमांक 90648 ही गाडी नालासोपारा येथून सुटण्याऐवजी दुपारी 4.24 वाजता भाईंदर स्थानकावरून सुटेल. ट्रेन क्रमांक 90208 भाईंदर-चर्चगेट (सकाळी 8 वाजता) आणि 90249 चर्चगेट-नालासोपारा (सकाळी 9:30) ही लोकल 12 डब्यांच्या ऐवजी 15 डबे धावणार आहे. तसेच ही ट्रेन चर्चगेट ते मुंबई सेंट्रल फास्ट ट्रकवर धावेल. हे बदल तात्पुरत्या स्वरुपात करण्यात आले आहेत. मात्र हे बदल का करण्यात आले आहेत. याचे कारण मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. 

मुंबईकरांना मिळणार 300 लोकलचं गिफ्ट

रेल्वेने मुंबई सेंट्रल आणि वांद्रे स्थानकांची क्षमता वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच जोगेश्वरीमध्ये नवी टर्मिनल्स आणि वसईमध्ये मेगा रेल्वे टर्मिलन्स उभारण्यात येणार आहे. मुंबई लोकल ट्रेन्समध्ये अतिरिक्त 300 ट्रेन्स जोडल्या जाणार आहेत. पोर्ट कनेक्टिव्हिटीला प्रोत्साहन देण्यासाठी पूर्वांचल ते मुंबईलला जोडण्यासाठी कॉरीडोर तयार करण्यात येणार आहे. मध्य रेल्वेतील परेल, एलटीटी, कल्याण आणि पनवेल या टर्मिनल्सची क्षमता वाढवण्यात येणारा आहे.