भय्यूजी महारांजी आई कुमुदिनी देवी यांचे निधन; अंतिम संस्काराहून गृहकलह समोर

दिवंगत अध्यात्मिक गुरू भय्यूजी महाराज यांची माता कुमुदिनी देवी यांचे निधन झाले आहे.

Updated: May 13, 2021, 04:02 PM IST
भय्यूजी महारांजी आई कुमुदिनी देवी यांचे निधन; अंतिम संस्काराहून गृहकलह समोर

इंदोर : दिवंगत अध्यात्मिक गुरू भय्यूजी महाराज यांची माता कुमुदिनी देवी यांचे निधन झाले आहे. इंदोरच्या खासगी रुग्णालययात त्यांच्यावर उपचार सूरू होते. कुमुदिनी देवी यांचे अंतिम संस्कार करण्याची इच्छा त्यांची नात आणि भय्यूजी महाराजांची मुलगी कुहू यांनी व्यक्त केली. परंतु भय्यूजी महाराजांच्या दुसऱ्या बायकोने अंतिम संस्काराचा हक्क कोणाचा यावर वाद घातला आहे.

कुमुदिनी देवी भय्यूजी महाराजांच्या आत्महत्येची महत्वाची साक्ष होती. तब्बेत खराब होण्याच्या कारणामुळे त्या इंदोरच्या इंडेक्स रुग्णालयात उपचार घेत होत्या. शनिवारी रात्री त्यांनी शेवटचा श्वास घेतला. आजीच्या निधनाची बातमी कळताच कुहू पुण्यावरून इंदोर येथे गेली. त्यावेळी तिने आजीचा अंतिम संस्कार करण्याची इच्छा व्यक्त केली. 

परंतु भय्यूजी महाराजांची दुसरी पत्नी आय़ुषी ने य़ावर आक्षेप घेतला.त्यावरून कुहू आणि सावत्र आई आयुषी यांच्यात खडाजंगी झाली. 

3 वर्षापूर्वी भय्यूजी महाराजांनी 12 जून रोजी 2018 रोजी आत्महत्या केली होती. त्यांच्या आत्महत्येप्रकरणी कुमुदिनी यांचा जबाब रेकॉर्ड करणे अद्यापही बाकी होते. त्यांची दुसरी पत्नी यांनी कुमुदिनी यांचा जबाब घेऊ नये. यासाठी न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यामुळे कुमुदिनी देवी यांच्यी मृत्यूची चौकशी होऊ शकते.