भाजप खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर यांची प्रकृती अस्थिर; उपचारासाठी मुंबईकडे रवाना

प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्या कार्यालयाने संबंधित माहिती दिली आहे. 

Updated: Mar 6, 2021, 06:20 PM IST
भाजप खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर यांची प्रकृती अस्थिर; उपचारासाठी मुंबईकडे रवाना

भोपाळ :  मध्यप्रदेशातील भोपाळच्या खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्या प्रकृती अचानक खालावली आहे. त्यांना शनिवारी दुपारी श्वास घेण्यास त्रास जाणवू  लागल्यामुळे त्यांना मुंबईच्या दिशेने हालवण्यात आलं आहे. मुंबईत दाखल झाल्यानंतर त्यांना कोकिलाबेन रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात येणार आहे. प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्या कार्यालयाने संबंधित माहिती दिली आहे.