मनसुख हिरेन यांचा पोस्टमार्टम रिपोर्ट समोर...अहवालातून मोठी माहिती उघड

मग मनसुख हिरेन यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? 

Updated: Mar 6, 2021, 07:27 PM IST
मनसुख हिरेन यांचा पोस्टमार्टम रिपोर्ट समोर...अहवालातून मोठी माहिती उघड

मुंबई : मनसूख हिरेन ( Mansukh Hiren ) यांच्या मृत्यूप्रकरणी नवी माहिती समोर आली आहे. झी 24 तासच्या हाती आलेल्या पोस्टमॉर्टम रिपोर्टनुसार ( Mansukh Hiren Postmortem Report ) कोणताही घातपात नसल्याचं सांगण्यात आलं आहे. मनसुख यांच्या शरीरावर कोणत्याही जखमा किंवा कोणतेही व्रण नाही आहेत, असा स्पष्ट उल्लेख शवविच्छेदन अहवालात नमूद करण्यात आला आहे. त्यामुळे मनसुख हिरेन यांचा मृत्यू नेमका झाला कसा? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

मनसुख हिरेन यांच्या पोस्टमॉर्टम रिपोर्ट अनुसार

मनसुख यांचा मृतदेह मिळाल्याच्या जवळपास 12 ते 24 तासापूर्वी त्यांचा मृत्यू झाल्याचा संशय

शरिरावर कोणत्याही प्रकारच्या जखमांच्या खुणा नाहीत

शरिरात कोणतं केमिकल आहे का, हे  केमिकल अहवाल नंतर स्पष्ट होईल 

कोणत्याही प्रकारच्या फाऊल प्लेची माहिती शवविच्छेदन अहवालात नाही

आता केमिकल चाचणी करण्यासाठी नमुने जे जे हाॅस्पिटल मध्ये पाठवण्यात आले आहेत. शवविच्छेदन अहवालानंतरही मृत्यूचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. त्यामुळे ही हत्या आहे की आत्महत्या या शंकांचं निरसन होऊ शकलेलं नाही. 

नेमकं प्रकरण काय आहे? 

काही दिवसापूर्वी मुकेश अंबानी यांच्या अँटेलिया बिल्डिंगसमोर जी बेवारस स्कॉर्पिओ आढळली होती, त्या स्कॉर्पिओ मालकाची हत्या झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. या मालकाची गाडी स्फोटकाने भरलेली स्कार्पिओ सापडण्याआधीच चोरीला गेली होती. मनसुख हिरेन हे या गाडीचे मालक होते. काल मुंब्रा इथल्या खाडीत त्यांचा मृतदेह सापडला.