रायपूर: 15 वर्षानंतर सत्तेत आलेल्या छत्तीसगडमध्ये काँग्रेसने भुपेश बघेल यांची राज्याच्या नव्या मुख्यमंत्रीच्या रुपात निवड केली आहे. पक्षाचे केंद्रीय पर्यवेक्षक मल्लिकार्जुन खडगे आणि राज्याचे प्रभारी पी.एल.पुनिया यांच्या उपस्थितीत ही निवड करण्यात आली. काँग्रेस कार्यालयातील आमदारांच्या बैठकीत त्यांची निवड करण्यात आली. बैठकीत पक्षश्रेष्ठींकडून आलेलं बंद पाकिटातील पत्र सगळ्यांसमोर उघडण्यात आलं. ज्यामध्ये श्री बघेल यांचं नाव होतं. सोमवारी भुपेश बघेल मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत.
भुपेश बघेल यांची या नंतर औपचारिकपणे निवड करण्यात आली. बघेल राज्याचे तीसरे आणि काँग्रेसचे दूसरे मुख्यमंत्री आहेत. या बैठकीत मुख्यमंत्रीपदाचे दूसरे प्रतिस्पर्धी डॉ. चरणदास महंत, ताम्रध्वज साहू आणि टी.एस.सिंहदेव देखील होते. छत्तीसगड विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने 90 पैकी 68 जागा जिंकल्या. भूपेश बघेल यांच्या घराबाहेर उत्साहाचा वातावरण आहे. कार्यकर्ते त्यांच्या घराबाहेर जल्लोष करत आहेत.