Big News : जम्मू- काश्मीरमध्ये मोठी दुर्घटना; सैन्यदलाच्या हेलिकॉप्टरचं क्रॅश लँडिंग

उधमपूरमधील पटनीटॉप येथे ही घटना घडली. 

Updated: Sep 21, 2021, 02:31 PM IST
Big News : जम्मू- काश्मीरमध्ये मोठी दुर्घटना; सैन्यदलाच्या हेलिकॉप्टरचं क्रॅश लँडिंग
छाया सौजन्य - सोशल मीडिया

मुंबई : जम्मू काश्मीरमध्ये मंगळवारी (21 सप्टेंबर 2021) अत्यंत मोठी दुर्घटना घडल्याचं पाहायला मिळालं. उधमपूरमधील पटनीटॉप येथे ही घटना घडली. ज्यामध्ये भारतीय सैन्यदलाचं चित्ता हेलिकॉप्टरचं क्रॅश लँडिंग करण्यात आलं होतं. पटनीटॉप भागात शिवगडच्या डोंगर परिसरात दुर्घटना घडल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

सदर घटनेनंतर सेना आणि पोलिसांचं बचाव पथक तातडीनं घटनास्थळी दाखल झालं. या अपघातामध्ये एका जवानाचा मृत्यू झाला असून दोघे गंभीर जखमी झाल्याचं कळत आहे. जखमींवर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरु करण्यात आले आहेत. 

एएनाय या वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार या भागात सैन्याचं शोधपथकही दाखल झालं आहे. पोलिसांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार या भागात धुक्याचं प्रमाण अधित असल्यामुळं दृश्यमानता कमी झाली, ज्यामुळं हा अपघात झालेला असू शकतो. 

(सविस्तर वृत्त लवकरच)