रेल्वेतील मिडल बर्थकरता वेगळे नियम, जाणून घ्या अन्यथा होईल नुकसान

रेल्वे प्रवासात मिडल बर्थ मिळाल्यास या गोष्टी लक्षात ठेवा ; अडचणी टळतील 

Updated: Sep 21, 2021, 01:04 PM IST
रेल्वेतील मिडल बर्थकरता वेगळे नियम, जाणून घ्या अन्यथा होईल नुकसान  title=

मुंबई : सामान्यपणे रेल्वेने प्रवास करताना प्रत्येकाला आपल्या आवडीची सिट हवी असते. कुणाला रेल्वेने प्रवास करताना स्लिपरमध्ये अपर बर्थ आवडते तर कुणाला लोअर बर्थ. तर काहींना साइड अपर किंवा साइड लोअर बर्थ आवडतात. फार कमी लोकं असतील ज्यांना मिडल बर्थ आवडते. पण रेल्वेने प्रवास करताना जर तुम्हाला मिडल बर्थ मिळाली तर तुम्ही त्याचे असलेले वेगळे नियम जाणून घ्या. 

मिडल बर्थने प्रवास करणाऱ्यांसाठी रेल्वेचे खास नियम 

भारतीय रेल्वेने मिडल बर्थकरता काही महत्वाचे नियम लागू केलेत. मिडल बर्थने प्रवास करणारी व्यक्ती 24 तास याचा वापर करू शकत नाही. अपर बर्थ ज्या प्रमाणे आपल्या सीटचा वापर करू शकतो. तसा मिडल बर्थने प्रवास करणारी व्यक्ती करू शकत नाही.

रेल्वेच्या नियमांनुसार, मि़डल बर्थने प्रवास करणारा प्रवासी फक्त आपल्या सीटचा वापर दुपारी करू शकतो. या व्यतिरिक्त त्यांना आपली सीट बंदच ठेवावी लागणार आहे. मिडल बर्थने प्रवास करणारा प्रवासी रात्री 10 ते सकाळी 6 वाजेपर्यंतच या मिडल बर्थचा वापर करू शकतो. रात्री 10 च्या अगोदर किंवा सकाळी 6 नंतर एखादा प्रवासी या मिडल बर्थचा वापर करत असेल तर त्याला नियमानुसार तसं करता येणार नाही. 

नियमानुसार, सकाळी 6 नंतर मिडल बर्थने प्रवास करणाऱ्या व्यक्तीला आपली सीट खाली ठेवावी लागणार आहे. जेणेकरून लोअर बर्थने प्रवास करणाऱ्या व्यक्तीला याचा त्रास होऊ नये. यामुळे ट्रेनने प्रवास करत असताना प्रवाशांनी आपल्या बर्थची संपूर्ण माहिती जाणून घेणे आवश्यक आहे.