दिल्लीत ISIS च्या दहशतवाद्याला अटक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार .... 

Updated: Aug 22, 2020, 10:45 AM IST
दिल्लीत ISIS च्या दहशतवाद्याला अटक title=
संग्रहित छायाचित्र

नवी दिल्ली : एकिकडे गणेशोत्सवाचा आनंद परमोच्च शिखरावर पोहोचला असतानाच दुसरीकडे देशाच्या राजधानीमध्ये एक मोठी कारवाई केली गेल्याची माहिती समोर येत आहे. शुक्रवारी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास रिज रोड येथून इस्लामिक स्टेट म्हणजेच ISIS च्या दहशतवाद्याला अटक करण्यात आली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अटक करण्यात आलेल्या दहशतवद्याकडून आयईडी स्फोटकं आणि पिस्तुल ताब्यात घेण्यात आलं आहे. धौलाकुआंवरुन हा दहशतवादी करोल बागच्या दिशेनं जात होता, तेव्हाच त्याला ताब्यात घेण्यात आलं. 

 

उत्तर प्रदेशचा आहे दहशतवादी 

अबु युसूफ खान असं अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्याचं नाव आहे. हा दहशतवादी मुळचा उत्तर प्रदेशचा असल्याचं म्हटलं जात आहे. दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या या दहशतवाद्याची चौकशी केली जात आहे. फक्त अबु खानच नव्हे तर दिल्लीमध्ये या दहशतवाद्याची मदत करणारे त्याचे काही साथीदारही लपून बसले असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. ज्यांना ताब्यात घेण्यासाठी आता पोलिसांनी वेगानं पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे.