बिहारमधील महाआघाडी सरकार पडण्याच्या मार्गावर

बिहारमध्ये राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. महाआघाडी जवळपास तुटण्याच्या मार्गावर आहे. आरजेडी आमदारांच्या बैठकीनंतर लालू यादव यांनी पुन्हा एकदा म्हटलं आहे की, 'तेजस्वी यादव उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा नाही देणार.'

Updated: Jul 26, 2017, 04:27 PM IST
बिहारमधील महाआघाडी सरकार पडण्याच्या मार्गावर title=

पटना : बिहारमध्ये राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. महाआघाडी जवळपास तुटण्याच्या मार्गावर आहे. आरजेडी आमदारांच्या बैठकीनंतर लालू यादव यांनी पुन्हा एकदा म्हटलं आहे की, 'तेजस्वी यादव उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा नाही देणार.'

आमदारांच्या बैठकीनंतर लालू यादव यांनी म्हटलं की, 'नितीश कुमार यांनी तेजस्वीचा राजीनामा नाही मागितला आहे आणि कोणतं स्पष्टीकरण ही नाही मागितलं आहे. त्यांना आणि तेजस्वीला जेथे कुठेही काही बोलायचं असेल ते बोलतील.'

आरजेडी अध्यक्ष म्हणतात की, नितीश महाआघाडी सरकारचे नेते आहेत. आरजेडी सरकारच्या प्रत्येक पाऊलाचं सक्रियपणे समर्थन करेल. आमदारांच्या बैठकीनंतर राबडी देवी यांनी म्हटलं की, 'तेजस्वी यादववर लावलेले सर्व आरोप खोटे आहेत. ते राजीनामा नाही देणार. भाजप आम्हला फसवण्याचा प्रयत्न करते आहे.'