Substance Worth Rs 850 Crore: बिहार पोलिसांनी केलेल्या एका मोठ्या कारवाईमध्ये काही शे कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. राज्यातील गोपालगंज तालुक्यामध्ये पोलिसांनी ही करावाई केली आहे. या कारवाईमध्ये पोलिसांनी अवघ्या 50 ग्रॅमचा एक पदार्थ जप्त केला आहे. मात्र या 50 ग्रॅम वजनाच्या पदार्थाची किंमत तब्बल 850 कोटी रुपये आहे असं सांगितलं तर तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल, पण हे खरं आहे.
बिहार पोलिसांनी या तिघांकडून जप्त केलेला हा फोटोत दिसणारा 50 ग्राम वजनाचा आणि भांडी घासण्याच्या काथ्याप्रमाणे वाटणारा पदार्थ हा साधासुधा नाही. या पदार्थाचं नाव कॅलिफॉर्नियम असं आहे. हा एक किर्णोत्सर्जन करणारा म्हणजेच रेडिओअॅक्टीव्ह पदार्थ आहे. हा पदार्थ या तिघांकडून बलथारी भागातून ताब्यात घेण्यात आला.
पोलिसांना त्यांच्या खबऱ्यांनी एका मौल्यवान पदार्थाची तस्करी होणार असल्याची माहिती दिलेली. काहीतरी संक्षयास्पद हलचाली या भागामध्ये सुरु आहेत, असं पोलिसांना खबऱ्यांकडून कळालं होतं. त्यानुसार पोलिसांनी कुच्चाईकोट पोलीस स्थानकाअंतर्गत येणाऱ्या बलथारी भागामध्ये छापा टाकून तीन आरोपींना ताब्यात घेतलं. या तिघांना ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी त्यांची कसून चौकशी केली. सुरुवातीला आपल्याला यामधील काहीच कल्पना नाही. आपण काहीही केलेलं नाही असं या दोघांचं म्हणणं होतं. मात्र या तिघांना खबऱ्यांनी दिलेली माहिती सांगण्याबरोबरच पोलिसी खाक्या दाखवला असता त्यांनी त्यांच्याकडे खरोखरच मौल्यवान पदार्थ असल्याचं सांगितलं.
नक्की वाचा >> लैंगिक सुखाची मागणी, ऊसाचं शेत, Lipstick, ब्लाउज अन् 9 हत्या... उत्तर प्रदेशमधील Serial Killer अटकेत
पोलिसांनी या तिघांकडून कॅलिफॉर्नियम नावाचा किरणोत्सर्जन करणारा पदार्थ जप्त केला. हा पदार्थ त्यांनी बोटभर उंचीच्या एका छोट्या पिवळ्या झाकणाच्या डबीत भरुन ठेवला होता. तसेच या तिघांकडून 4 मोबाईल फोनही जप्त करण्यात आले आहेत. पोलिसांनी यासंदर्भात एक पत्रकच जारी केलं आहे. बिहार पोलिसांनी यासंदर्भात अण्विक ऊर्जा विभाग म्हणजेच डिपार्टमेंट ऑफ अटॉमिक एनर्जीशी (डीएई) संपर्क साधला. त्यांनी या पदार्थाची पहाणी करण्यासाठी तज्ज्ञांना पाठवण्याची मागणी केली. तज्ज्ञांनी या पदार्थाची पहाणी करु तो कॅलिफोर्नियमच असल्याची खात्री केली आहे.
नक्की वाचा >> 'कोर्टात चेंगराचेंगरी व्हावी अशी माझी इच्छा नाही पण इथे आमिर खानही..'; CJI चंद्रचूड यांचं विधान
अंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये 50 ग्राम कॅलिफॉर्नियमची किंमत तब्बल 850 कोटी रुपये इतकी आहे. आपण छापेमारी करुन ताब्यात घेतलेल्या एवढ्याश्या गोष्टीची किंमत ऐकून अनेक पोलीस अधिकारीही चक्रावले आहेत. कॅलिफॉर्नियम हा नैसर्गिकरित्या आढळून येणारा पदार्थ नाही. या पदार्थाची सर्वात आधी 1950 मध्ये अमेरिकेतील कॉलिफॉर्निया विद्यापिठामधील प्रयोगशाळेत निर्मिती करण्यात आलेली. याच राज्याचं नाव या पदार्थाला देण्यात आलं. करियम आणि हेलियमच्या रेणूंपासून या पदार्थाची निर्मिती केली जात असल्याने त्याची किंमत एवढी आहे. हा पदार्थ प्रामुख्याने शस्त्रांमध्ये वापरला जातो. हा जगातील दुसरा सर्वात महागडा पदार्थ आहे. हा पदार्थ या तिघांकडे नेमका आला कुठून आणि ते तो कुणाला विकणार होते? यामागे इतर कोणी आहे का याचा तपास आता पोलीस करत आहेत.