बिहार पोलिसांनी सीबीआयला सोपवले सुशांत प्रकरणातील चौकशीचे कागदपत्र

बिहार पोलिसांना पक्षकार करण्याची सीबीआयची मागणी

Updated: Aug 8, 2020, 08:49 AM IST
बिहार पोलिसांनी सीबीआयला सोपवले सुशांत प्रकरणातील चौकशीचे कागदपत्र title=

मुंबई : सीबीआयने आता सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यूशी संबंधित प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. बिहार पोलिसांनी सुशांत प्रकरणाशी संबंधित सर्व कागदपत्रे सीबीआयकडे दिली आहेत. त्याचबरोबर सुशांत सिंह प्रकरणात बिहार पोलिसांना देखील पक्षकार करण्याची मागणी सीबीआयने सर्वोच्च न्यायालयात केली आहे.

सुशांत सिंह राजपूत प्रकरणात दररोज काहीतरी नवीन खुलासे पाहायला मिळत आहे. आता बिहार पोलिसांनी या प्रकरणाशी संबंधित सर्व कागदपत्रे सीबीआय टीमकडे सोपविली आहेत. दिल्ली सीबीआयच्या पथकाला कागदपत्रे देण्यात आली आहेत.

सीबीआयला काम करताना स्पष्टता हवी आहे. सुशांतसिंह राजपूत प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात 18 ऑगस्ट रोजी सुनावणी होणार आहे.

या व्यतिरिक्त, केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात प्रत्यारोपणाचा अर्ज दाखल केला आहे. रिया चक्रवर्तीने खटल्याची चौकशी बिहारहून मुंबईला स्थलांतरित करण्याची मागणी केली आहे. त्यामध्ये पक्षकार बनवण्याची मागणी देखील केली गेली आहे.