Google : सावधान| तुम्ही गूगलवर 'या' गोष्टी सर्च करताय?

Google : गूगलमुळे आपल्या माहितीत (Information) भर पडते, ज्ञान (knowledge) वाढतं. मात्र काही अशा गोष्टी आहेत, ज्या सर्च करणं धोकादायक (dangerous) आणि अडचणीचं ठरु शकतं.   

Updated: Sep 29, 2022, 07:47 PM IST
Google : सावधान| तुम्ही गूगलवर 'या' गोष्टी सर्च करताय? title=

Online Crime : गूगलवर (Google) आपल्याला हवं ते मिळतं. अनेकदा आपण रिकाम्या वेळेत जे सुचेल ते शोधण्याचा त्याबाबत जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. गूगलमुळे आपल्या माहितीत (Information) भर पडते, ज्ञान (knowledge) वाढतं. मात्र काही अशा गोष्टी आहेत, ज्या सर्च करणं धोकादायक (dangerous) आणि अडचणीचं ठरु शकतं. आतापर्यंत काहींनी गूगलच्या मदतीने संवेदनशील गोष्टींबाबत माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय. त्यामुळे अशा संबंधित व्यक्तींना जेलची हवा खावी लागलीय. गूगलवर असं नक्की काय सर्च करायचं नसतं तसंच काय सर्च केल्याने अडचणी वाढू शकतात, हे आपण जाणून घेणार आहोत. (never search this things on search engine google else you go in jail)

हत्यारं (Weapon)

अनेक जण गंमतीने गूगलवर अनेक वेळा शस्त्रे बनवण्याच्या प्रक्रियेबद्दल सर्च करतात, पण तुम्हाला माहिती आहे का की असं केल्यानं अडचणी वाढू शकतात. कोणत्याही दहशतवादी कारवायांशी संबंधित असलेल्या अशा शोधांवर भारतीय सुरक्षा यंत्रणा नेहमीच लक्ष ठेवून असते अशा परिस्थितीत जर तुम्ही शस्त्रे बनवण्याच्या प्रक्रियेचा शोध घेतला तर तुरुंगात पोहोचू शकता.

दंगलीचे व्हीडिओ

माहिती गोळा करण्याच्या उद्देशाने गूगलवर दंगलीचे व्हीडीओ शोधत असाल, तर तुम्हाला कोणत्याही अडचणीचा सामना करावा लागू नये, मात्र असेच व्हीडिओ पुन्हा पुन्हा पाहत असाल तर तुमच्यावर कारवाई होऊ शकते. कारण अनेकदा गुन्हेगार असे व्हीडिओ पाहून प्रेरणा घेतात आणि नंतर गुन्हे करतात. अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत. अशा परिस्थितीत सरकार अशा विषयांवर शोध घेणाऱ्यांवर कडक कारवाई करते.