व्हिडिओ : भर पंचायतीसमोर 'तीन तलाक', पत्नीनं पतीच्या कानाखाली वाजवली

 तीन तलाक ही पद्धत कुराणच्या मूळ सिद्धांताविरुद्ध असल्याचंही न्यायालयानं म्हटलं होतं. 

Updated: Dec 7, 2018, 03:40 PM IST
व्हिडिओ : भर पंचायतीसमोर 'तीन तलाक', पत्नीनं पतीच्या कानाखाली वाजवली title=

मुजफ्फरपूर : सुप्रीम कोर्टानं तीन तलाक अवैध ठरवल्यानंतरही खुलेआम हा प्रकार अजूनही सुरूच असल्याचं दिसून येतंय. मुस्लिम समाजातील पंचायतीही या पद्धतीला अजूनही पाठिंबा आणि प्रोत्साहन देत असल्याचं आणखीन एका घटनेतून समोर आलंय. बिहारच्या मुजफ्फरपूरमधून तीन तलाकचं एक प्रकरण समोर आलंय. भर पंचायतीत हा निर्णय घेण्यात आला. परंतु, पतीनं 'तलाक तलाक तलाक' म्हटल्यानंतर संतापलेल्या पत्नीनं भर पंचायतीत पतीच्या कानाखाली ठेवून दिली... यामुळे उपस्थितांनाही आश्चर्यचा धक्का बसला. 

मुजफ्फरपूरच्या सरैय्या प्रखंडच्या बसंतपूर उत्तरी पंचायतीतील आहे. बसंतपूर पंचायतीसमोर पती-पत्नीच्या तलाकचा निर्णय घेण्यात आला. कौटुंबिक वादानंतर पंचायतीनं या दोघांच्या तलाकसाठी होकार दिला. धक्कादायक म्हणजे, कायदेशीर पद्धतीनं घटस्फोट घेण्याऐवजी हे प्रकरण तोंडी 'तीन तलाक' पद्धतीनं मिटवण्याचा प्रयत्न करण्यात आला. पोलीस प्रशासनाला याबद्दल कोणतीही माहिती देण्यात आली नव्हती. 

व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा

पंचायतीनं पती-पत्नीला बोलावलं... आणि पतीनं पत्नीसमोर 'तलाक तलाक तलाक' म्हटलं... पत्नीनं कबुलनामा म्हणून पतीच्या कानाखाली वाजवली. त्यानंतर चवताळून उठलेल्या पतीनंही पत्नीवर भर पंचायतीसमोर हात उचलला. 

दरम्यान, या घटनेची अद्याप कोणत्याही पक्षाकडून तक्रार दाखल करण्यात आलेली नाही. तीन तलाक ही पद्धत न्यायालयानं अवैध ठरवताना 'असंवैधिनिक, बेकायदेशीर आणि शून्य करार' असल्याचं म्हटलं होतं. तीन तलाक ही पद्धत कुराणच्या मूळ सिद्धांताविरुद्ध असल्याचंही न्यायालयानं म्हटलं होतं.