पेट्रोल भरायला गाडी आणली अन् जाळचं लागला, थरकाप उडवणारा VIDEO

IFS अधिकारी प्रवीण अंगुसामी यांनी हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यांनी हा व्हिडीओ 27 जानेवारीला शेअर केला आहे.

Updated: Jan 28, 2021, 07:30 PM IST
पेट्रोल भरायला गाडी आणली अन् जाळचं लागला, थरकाप उडवणारा VIDEO title=

मुंबई: अनेकदा पेट्रोल पंपावर पेट्रोलभरत असताना अनेक अपघात घडत असल्याच्या घटना समोर येत असतात. कधी ग्राहकांच्या चुकीमुळे तर कधी अनावधानानं असे प्रसंग घडल्याचं समोर आलं आहे. पण आता एक थरकाप उडवणारा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

पेट्रोल पंपारवर दुचाकीस्वार येताच दुचाकी अचानक पेट घेते आणि हाहाकार उडतो. ही संपूर्ण घटना पेट्रोल पंपावर असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या व्हि़डीओमध्ये आपण पाहू शकता की दुचाकीस्वार पेट्रोल भरण्यासाठी दुचाकी घेऊन येतो. तितक्यात अचानक दुचाकी पेट घेते. पेट्रोल पंपावर गोंधळाचं वातावरण निर्माण होतं. या घटनेत दुचाकीस्वार आगीत होरपळून जखमी झाला आहे.

पेट्रोल पंपावर काम करणारी कर्मचारी महिला हजरजबाबीपणा दाखवत दुचाकीवर पाणी ओतते. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली होती. हा व्हिडीओ नेमका कोणत्या परिसरातील आहे हे अद्याप कळू शकलं नाही. मात्र सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

IFS अधिकारी प्रवीण अंगुसामी यांनी हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यांनी हा व्हिडीओ 27 जानेवारीला शेअर केला आहे. 9 हजारहून अधिक लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. 200 हून अधिक लोकांनी रिट्वीट केला आहे. अंगावर काटा आणणारा हा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या तुफान व्हायरल होत आहे.