मुंबई : काल्पनिक चलन बिटकॉईनचं मूल्य १० लाख रूपये प्रति बिटकॉईनपर्यंत पोहोचल्याने, ई पोंजी सारखा प्रकार होवू शकतो, असा संशय व्यक्त केला जात आहे.
एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, रिझर्व्ह बँकसह, सेबीसह विविध सरकारी एजन्सीज लवकरच बैठक घेणार आहेत, कारण यात गुंतवणूक करता यावी, तसेच यावर सुरक्षेसाठी काय उपाय नेमता येतील. काही नियम काल्पनिक चलनासाठी ठरवणे आवश्यक आहे, नाही तर याचा देशात गैरफायदा उठवला जावू शकतो, या आधी याचे नियम आखणे महत्वाचे आहे.
आणखी एका अधिकाऱ्याने म्हटले आहे की, संपत्ती संग्रह, बेकायदेशीर प्रॉपर्टी सारख्या गोष्टींवर लगाम लावण्यासाठी जे नियम आहेत, तसेच मनी लॉन्ड्रिंग आणि काळधन सारख्या प्रकारांवर जो कायदा लावला जातो, तो अशा प्रकारच्या चलनांसाठी देखील लावण्यात यावा.
अधिकाऱ्यांना संशय आहे की, या प्रकारची मुद्रा अचानक आलेल्या उसळीमुळे, भारत नव्वदच्या दशकात प्लांटेशन घोटाळा, आणि १९२० च्या दशकात अमेरिकेत समोर आलेला पोंजी घोटाळा सारखा घोटाळा होण्याची दाट शक्यता आहे.