येडियुराप्पाच्या मुलाचं अखेर तिकिट कापलं

कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अंतिम दिवस आहे.

Updated: Apr 24, 2018, 03:12 PM IST

बंगळुरू : कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अंतिम दिवस आहे. आज कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे बागलकोट जिल्ह्यातील बदामी विधानसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. सिद्धरामय्या यांनी यापुर्वी म्हैसुर जिल्ह्यातील चामुंडेश्वरी विधानसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. सिद्धरामय्या यांनी काहीही करुन हरविण्यासाठी भाजपानं अपेक्षेप्रमाणं बेल्लारीच्या रेड्डी बंधूंमधील श्रीरामलू यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळं बदामीमध्ये देखील हायहोल्टेज लढत पाहायला मिळणार आहे.

आज शेवटचा दिवस

आज शेवटचा दिवस असला तरी भाजपमध्ये आणि काँग्रेसच्या उमेदवारांची नावं अजूनही निश्चित झालेली नाहीत. किंबहुना बंडखोरी टाळण्यासाठी मुद्दाम काही नावं जाहीर झालेलं नाही. 

येडीयुराप्पा यांच्या मुलाचं तिकीट कापलं

वरुणा मतदारसंघातुन सिद्धरामय्या यांचे चिरंजीव यथिंद्र हे निवडणूक लढवित आहेत. यथिंद्र याच्या विरोधात येडीयुराप्पा यांचे चिरंजीव विजेयंद्रा यांनी निवडणुक लढविण्याची इच्छा व्यक्त केली होती. वरुणा मतदारसंघातून विजयेंद्र यांना तिकीट देण्यात आलेलं नाही. त्यानंतर म्हैसुरमध्ये भाजपाच्या कार्यकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करुन तोडफोड केली. इतकचं नव्हे तर अनेक पदाधिका-यांनी आपले राजीनामा सादर केला. त्यामुळं म्हैसुरमध्ये भाजपा नेत्यांमध्ये विजेंयंद्राला उमेदवारी देण्यासंदर्भात बैठक सुरु आहे.