कोलकाता : क्रिकेटच्या मैदानावर एक दु:खद घटना घडली आहे. क्रिकेट खेळताना डोक्याला बॉल लागल्याने एका पॅरामेडिकल विद्यार्थ्याचा मृत्य़ू झाला आहे. पोलिसांनी सोमवारी म्हटलं की, ही घटना पश्चिम बंगालच्या कल्याणी येथे घडली. ज्यामध्ये 21 वर्षाच्या कौशिक आचार्यचा डोक्याला बॉल लागल्याने मृत्यू झाला आहे.
विकेटकीपिंग करतांना या खेळाडूच्या डोक्याला बॉल लागला. जखमी झालेल्या खेळाडुला कल्याणीच्या जेएनएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं. जेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. हा खेळाडू मुर्शिदाबादचा राहणारा होता.