Video : स्वच्छता अभियानात भाजपच्या महिला नेत्याकडून अर्वाच्य शिवीगाळ

भाजपच्या महिला नेत्याकडून अर्वाच्य शिवीगाळ ऐकायला मिळाली. या व्हिडिओ व्हायरल होत आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Sep 19, 2017, 08:38 PM IST
Video : स्वच्छता अभियानात भाजपच्या महिला नेत्याकडून अर्वाच्य शिवीगाळ title=
छाया सौजन्य : ANI

भोपाळ :  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महत्वाकांक्षी योजना 'स्वच्छ भारत अभियान' सध्या वेगळ्याच कारणांसाठी चर्चेत येत आहे. मध्यप्रदेशात अशीच एक घटना घडली. चक्क स्वच्छता अभियानादरम्यान भाजपच्या महिला नेत्याकडून अर्वाच्य शिवीगाळ ऐकायला मिळाली. या व्हिडिओ व्हायरल होत आहे.

सिवनी जिल्ह्यातील शहर सिवनी येथे हा प्रकार घडला असून येथील बस स्थानकात स्थानिक भाजप कार्यकर्त्यांचा स्वच्छता अभियानाचा कार्यक्रम सुरु होता. भाजप कार्यकर्त्यांचे स्वच्छता अभियान सुरु असताना एका महिला नेत्याने रस्त्यावरुन जाणाऱ्या एका व्यक्तीला मारहणा केली. एवढ्यावरच न थांबता तिने अर्वाच्य शिवीगाळ केली. 

पाहा हा व्हिडिओ :