Three Models Of Vande Bharat Trains Run In Marathi: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने आज (14 एप्रिल) ‘संकल्प पत्र’ नावाने जाहीरनामा प्रसिद्ध केला. यामध्ये गरीबांसाठी तीन कोटी घरे, मोफत रेशन योजना, मोफत उपचार सुविधा, घराघरांपर्यंत पाईपलाईनने गॅस यासह अनेक मोठ्या घोषणा पीएम मोदींनी केल्या आहेत. भारतीय जनता पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रेल्वे प्रवाशांसाठी मोठी घोषणा केली.
दरम्यान वंदे भारत ट्रेनचा देशभरात विस्तार करण्यात येणार आहे. पण पुढे जाऊन भारतात तीन प्रकारच्या वंदे भारत ट्रेन धावतील अशी महत्त्वपूर्ण घोषणा नरेंद्र मोदी यांनी केली. यामध्ये स्लीपर, चेअर कार आणि मेट्रो वंदे भारतचा समावेश असणार आहे.
वंदे भारत एक्सप्रेस सध्या देशात विविध ठिकाणी धावत आहे. हायटेक फीचर्स आणि सुपरफास्ट स्पीड यामुळे एक्सप्रेस अल्पावधीतच लोकप्रिय झाली आहे. यामध्ये वंदे चेअर कार, वंदे मेट्रो आणि वंदे स्लीपर अशा तीन रेल्वेंचा समावेश असेल. लांब पल्ल्यांच्या प्रवासासाठी स्लीपर वंदे भारत असणार आहे. तर मेट्रो वंदे भारत ट्रेनने कमी अंतरावरील दोन शहरे जोडली जाणार आहेत. तसेच चेअरकार वंदे भारत आता सुरुच आहेत. दरम्यान 100 किलोमीटरहून अधिक अंतर कापण्यासाठी केवळ वंदे मेट्रो रेल्वे सुरू करण्यात येणार आहे. वंदे चेअर कार 100 ते 550 किलोमीटर अंतरासाठी योग्य आहे. तथापि, 550 किलोमीटरहून अधिक अंतराच्या प्रवासासाठी वंदे स्लीपर ही एकमेव रेल्वे असेल.
सध्या वंदे भारत एक्स्प्रेसची ताशी 160 किलोमीटर वेगाने धावण्याची क्षमता आहे. फक्त, भारतीय रेल्वेच्या क्षमतेनुसार, ती ताशी 130 किमी वेगाने धावते. त्यामुळे येत्या तीन ते चार वर्षांत देशातील रेल्वे अद्ययावत करण्यात येणार आहे. यामुळे वंदे भारतचा पूर्ण क्षमतेने वापर करणे शक्य होईल.
अहमदाबाद मुंबई बुलेट ट्रेनचे काम वेगाने सुरू आहे. ते जवळपास अंतिम टप्प्यात आहेत. त्याचप्रमाणे उत्तर भारतात बुलेट ट्रेन, दक्षिण भारतात बुलेट ट्रेन आणि पूर्व भारतात बुलेट ट्रेन धावताना दिसणार आहे. यासाठी सर्वेक्षणाचे काम लवकरच सुरू करण्यात येणार आहे.