शिवपुरी : भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि खांडवाचे खासदार नंदकुमार सिंह चौहान यांचा एक व्हिडिओ व्हायरल झालाय. यामध्ये खासदार आणि त्यांचे काही समर्थक टोल कर्मचाऱ्यांसोबत हाणामारी करताना दिसत आहेत. या घटनेत दोन कर्मचारी जखमी झाल्याचं समजतंय.
मिळालेल्या माहितीनुसार, शिवपुरीहून गुना जाणाऱ्या आग्रा - मुंबई राष्ट्रीय महामार्गावर पूरनखेडीजवळच असलेल्या टोल प्लाझावरून चौहान यांच्या गाडीचा ताफा निघाला होता. यावेळी या गाड्यांच्या ताफ्याला कर्मचाऱ्यांनी त्यांना टोलची विचारणा केली. परंतु, ही विचारणा आमदार महाशयांना चांगलीच झोंबली... आणि त्यांच्या समर्थकांकडून टोल कर्मचाऱ्यांना मारहाण करण्यात आली.
यह है भाजपा की संस्कृति और संस्कार प्रदेश भारतीय जनता पार्टी के अध्यक्ष रह चुके और वर्तमान में सांसद नंदकुमार चौहान किस तरह कोलारस के पूरनखेड़ी टोल टैक्स टोल नाके पर अपनी ड्यूटी कर रहे कर्मचारियों के साथ अपने समर्थकों सहित मारपीट कर रहे हैं | pic.twitter.com/AqC9uHFWEe
— Ajay Singh (@ASinghINC) October 5, 2018
ही घटना शुक्रवारी जवळपास ४.०० वाजल्याच्या सुमारास घडली. चौहान हे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या शिवपुरी दौऱ्यासाठीची तयारीची पाहणी करण्यासाठी आले होते.
विरोधी नेते अजय सिंह यांनी ट्विट करत सोशल मीडियावर या घटनेवर तीव्र निषेध व्यक्त केलाय. 'ही भाजपची संस्कृती आणि संस्कार... माजी प्रदेशाध्यक्षांच्या उपसथितीत ड्युटीवर तैनात कर्मचाऱ्यांना मारहाण करण्यात आली... कायदा हातात घेणाऱ्या खासदार नंदकुमार सिंह चौहान आणि त्यांच्या समर्थकांवर तत्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा' अशी त्यांनी मागणी केलीय.