नवी दिल्ली: आगामी लोकसभा निवडणुकीची रंगीत तालीम म्हणून पाहिल्या जाणाऱ्या राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगढ, मिझोराम आणि तेलंगणा या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची तारीख शनिवारी जाहीर करण्यात आली. निवडणूक आयोगाने दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. मात्र, आता या पत्रकार परिषदेवरून वाद निर्माण झाला आहे.
निवडणूक आयोगाने सुरुवातीला सकाळी १२ वाजता पत्रकार परिषद आयोजित केली होती. मात्र, अचानकपणे ही वेळ बदलण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अजमेर येथे दुपारी एक वाजता जाहीर सभा होती. निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर तातडीने आचारसंहिता लागू होते. त्यामुळे ही सभा रद्द करावी लागली असती. परिणामी निवडणूक आयोगाकडून पत्रकार परिषद तीन वाजता घेण्यात आली, असा आरोप विरोधकांनी केला. हा प्रकार खूपच दुर्दैवी असल्याचे यशवंत सिन्हा यांनी सांगितले.
Unfortunate that Election Commission postponed announcement of election dates in 5 states only to enable Modi to address his public meeting in Ajmer, Rajasthan. Very sad.
— Yashwant Sinha (@YashwantSinha) October 6, 2018