अहमदाबाद: गुजरातच्या नरोदा येथे भाजपच्या आमदाराने राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला नेत्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथील कुबेरनगर परिसरात हा प्रकार घडला.
स्थानिक नागरिकांच्या पाण्याच्या समस्येवर जाब विचारण्यासाठी राष्ट्रवादीच्या नीतू तेजवानी नरोदामधील भाजपचे आमदार बलराम थवानी यांच्या कार्यालयात गेल्या होत्या. विभागातील घरे आणि कार्यालयांतील कापलेल्या नळजोडण्या दोन दिवसांत पुन्हा दिल्या नाहीत तर, कार्यालयासमोर धरणे धरण्याचा इशारा त्यांनी थवानींना दिला.
यानंतर बलराम थवानी यांनी माझे काहीही ऐकून न घेताच माझ्या कानशिलात लगावली. त्यांच्या समर्थकांनी आम्हाला तेथून जबरदस्तीने हटवायला सुरुवात केली. या झटापटीत मी खाली पडले तेव्हा थवानी यांनी मला लाथा मारायला सुरुवात केली. या लोकांनी माझ्या नवऱ्यालाही मारले. त्यामुळे भाजपच्या राज्यात महिला कशा सुरक्षित राहणार, एवढाच प्रश्न मला पंतप्रधान मोदींना विचारायचा असल्याचे तेजवानी यांनी म्हटले.
#WATCH BJP's Naroda MLA Balram Thawani kicks NCP leader (Kuber Nagar Ward) Nitu Tejwani when she went to his office to meet him over a local issue yesterday. Nitu Tejwani has registered a complaint against the MLA. #Gujarat pic.twitter.com/dNH2Fgo5Vw
— ANI (@ANI) June 3, 2019
ही व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर थवानी यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. कुणालाही मारहाण करण्याचा माझा हेतू नव्हता. जमावाकडून मला धक्काबुक्की करण्यात आली. स्वसंरक्षणासाठी मारलेली लाथ चुकून महिलेला लागली, असे त्यांनी सांगितले. हा वाद वाढल्यानंतर थवानी यांनी माफी मागितली आहे.
या घटनेनंतर नीतू तेजवानी यांनी बलराम थवानी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांविरोधात तक्रार दाखल केली आहे. नीतू तेजवानी यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत. पोलिसांनीही या घटनेचा तपास सुरु केला आहे. आम्ही वृत्तवाहिन्यांवर हा व्हिडिओ पाहिला आणि आता आमच्याकडे या प्रकरणी तक्रारही आल्याची माहिती झोन ४चे पोलीस उपायुक्त नीरज बडगुजर यांनी दिली.
Nitu Tejwani, NCP leader from Naroda: I had gone to meet BJP MLA Balram Thawani over a local issue but even before hearing me he slapped me, when I fell down he started to kick me. His people also beat up my husband. I ask Modi ji, how are women safe under the BJP rule? #Gujarat pic.twitter.com/PWUjekyyyC
— ANI (@ANI) June 3, 2019
Balram Thawani,BJP MLA who was caught on camera kicking a woman NCP leader in Naroda: I got swayed by emotions,I accept the mistake, it was not intentional. I have been in politics for last 22 years,such thing has never happened before. I will say sorry to her. #Gujarat pic.twitter.com/FNZWzYt4gY
— ANI (@ANI) June 3, 2019