जेपी नड्डा भाजपाचे कार्यकारी अध्यक्ष, संसदीय मंडळाच्या बैठकीत निर्णय

 गृहमंत्री अमित शाह हे डिसेंबरपर्यंत भाजपा अध्यक्ष पदावर राहणार

Updated: Jun 17, 2019, 08:26 PM IST
जेपी नड्डा भाजपाचे कार्यकारी अध्यक्ष, संसदीय मंडळाच्या बैठकीत निर्णय  title=

नवी दिल्ली : भाजपा संसदीय मंडळाची बैठक नुकतीच पार पडली असून यामध्ये महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. या निर्णयानुसार जे.पी.नड्डा यांना भाजपाचे कार्यकारी अध्यक्ष बनविण्यात आले आहे. तर अमित शहा हेच भाजपाचे अध्यक्ष राहणार असल्याचे निश्चित झाले आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी यासंदर्भात माहीती दिली. 

जेपी नड्डा यांना कार्यकारी अध्यक्ष बनवण्याचा निर्णय संसदीय मंडळाच्या बैठकीत घेण्यात आल्याचे राजनाथ यांनी सांगितले. गृहमंत्री अमित शाह हे डिसेंबरपर्यंत भाजपा अध्यक्ष पदावर राहणार असल्याची माहीती यावेळी समोर आली आहे.