व्यापाऱ्याची हजारो कोटींची संपत्ती ईडीने केली जप्त

काळ्यापैशांच्या विरोधात मोदी सरकारने एक मोठं पाऊल उचललं आहे. सिद्धिविनायक लॉजिस्टिक कंपनीचे मालक रूपचंद बेद यांची ५० कोटींची संपत्ती जप्त करण्यात आली आहे. ईडीने रूपचंद यांच्या सूरत आणि भरूच हॉटेलमध्ये, लग्जरी कार, बंगला अशी 2.77 कोटींची संपत्ती जप्त केली आहे.

Updated: Jun 10, 2017, 03:05 PM IST
व्यापाऱ्याची हजारो कोटींची संपत्ती ईडीने केली जप्त title=

नवी दिल्ली : काळ्यापैशांच्या विरोधात मोदी सरकारने एक मोठं पाऊल उचललं आहे. सिद्धिविनायक लॉजिस्टिक कंपनीचे मालक रूपचंद बेद यांची ५० कोटींची संपत्ती जप्त करण्यात आली आहे. ईडीने रूपचंद यांच्या सूरत आणि भरूच हॉटेलमध्ये, लग्जरी कार, बंगला अशी 2.77 कोटींची संपत्ती जप्त केली आहे.

एप्रिलमध्ये रूपचंद बेद यांना बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ महाराष्ट्र आणि कॅनरा बँकेचं १६०० कोटींचं लोन न फेडल्याने ईडीने अटक केली होती. रूपचंदवर आरोप होता की, त्यांनी 450 ट्रक खरेदी करुन त्यांच्या ड्रायव्हरला मालक बनवण्याची ऑफर केली होती आणि त्यांच्याकडून पैसे घेतले होते.

सूरत आणि भरूच हॉटेल, सूरत, नवी मुंबई, पुणे आणि भरूचचं ऑफिस, सूरतचा बंगला, ऑडी कार क्यू 7, ए-4 जॅग्वार कार, बीएमडब्ल्यू कार, 2.77 कोटी रोख रक्कम आणि आणि सूरत, उदयपुर, दादरा व नगर हवेली आणि ठाणे येथील फ्लॅट जप्त केला आहे.