Corona Vaccine संदर्भात सरकारची ब्लू प्रिंट, तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर

गेल्या आठवड्याभरापासून सरकार ब्लू प्रिंटवर काम करत आहे.

Updated: Dec 8, 2020, 09:02 PM IST
Corona Vaccine संदर्भात सरकारची ब्लू प्रिंट, तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर  title=

नवी दिल्ली : मागच्या ९ महिन्यापासून कोरोना वायरसविरोधात (Coronavirus)लढाई सुरु आहे. जगभरातील नागरिक कोरोना वॅक्सिनची (Corona Vaccine) वाट पाहतायत. वेळेत गरजूपर्यंत वॅक्सिन पोहोचवणे हे केंद्र सरकारसमोरचं आव्हान आहे. गेल्या आठवड्याभरापासून सरकार ब्लू प्रिंटवर काम करत आहे. मंगळवारी कोरोना वॅक्सिन संदर्भात महत्वाची माहिती दिलीय. ज्यामध्ये अनेक प्रश्नांची उत्तरे देण्यात आलीयत. 

Every Person will get 2 to 3 corona doses

भारतात एकूण ९ वॅक्सिन वेगवेगळ्या टप्प्यात आहेत. यातील तीन वॅक्सिन आपत्कालिन वापरासाठी मागण्यात आलीय. यामधील एक किंवा त्याहून अधिक वॅक्सिनला प्रमाणपत्र मिळू शकते.

How will the vaccine reach every village?

 

६ वॅक्सिन क्लिनिकल ट्रायलमध्ये आहेत. ३ क्लिनिकल ट्रायलच्या वेगवेगळ्या टप्प्यात आहेत. कोणाचे २ तर कोणाचे ३ डोस घ्यावे लागणार आहेत. 

१४ एप्रिलला सरकारने एक वॅक्सिन टास्क फोर्स बनवले. ७ ऑगस्टला केंद्र सरकारने आणि एक ग्रुप बनवला. NEGVAC - NATIONAL एक्सपर्ट ग्रुप ऑन वॅक्सीन एडमिनिस्ट्रेशन फॉर कोविड-19 असे याचे नाव आहे. वॅक्सिन कशी दिली जाणार ? सामान कुठून येणार ? राज्यांसोबत कसा ताळमेळ साधणार याची माहिती देण्यात आली. 

भारतात २ लाख ४० हजार ट्रेंड वॅक्सिनेटर आहेत जे लसीकरण कार्यक्रम आणि इतर महत्वाच्या लसीकरणाचे काम करतात. पण कोरोना वॅक्सीनसाठी १ लाख ५४ हजार ट्रेंड वॅक्सिनेटर्सची गरज आहे. इतर लोकं नियमित लसीकरणाचे काम पाहतील.

More than 1.5 lakh people will give Corona Doze

भारतात सर्वात आधी १ कोटी सरकारली आणि प्रायव्हेट कोरोना वॉरियर्सना वॅक्सिन दिले जाईल. यामध्ये पोलीस फोर्स, सैन्य, पालिका कर्मचाऱ्यांना लस दिली जाईल. त्यानंतर ५० वर्षांहून मोठे आणि ५० वर्षांहून लहान पण जे आजारी आहेत त्यांना लस दिली जाईल. या यादीवर अद्याप विचार सुरु आहे. यामध्ये बदल देखील होऊ शकतो. 

Who will get the corona vaccine first?

राज्य आणि जिल्हा स्तरावर डेटा एकत्र केला जातोय. त्याची पडताळणी केली जाईल. कोरोना एपमधून देखील डेटा एकत्र करण्याचे काम सुरु आहे. राज्य स्तरावर मिटींग सुरु आहेत. जिल्हा स्तरावर १२ डिसेंबरपर्यंत डेटा एकत्र ठेवण्याचे लक्ष्य आहे. ब्लॉक स्तरावर १५ डिसेंबरपर्यंत मिटींग होईल.