Crime News : प्रेमामध्ये गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंडमध्ये रूसवे-फुगवे पाहायला मिळतात. यातून अनेकवेळा काही सनकी स्वभावाचे छोट्याशा कारणावरून टोकाचा निर्णय घेतल्याच्या अनेक घटना आपण पाहिल्या असतील. अशातच आर्थिक राजधानी मुंबईतील ठाण्यामधील घोडबंदर परिसरात अशाच प्रकारच्या वादातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सनकी बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंड आणि तिच्या आईवर शस्त्राने हल्ला केला. सुरेश वाडेकर असं आरोपीचं नाव आहे. (Boyfriend attacked girlfriend and her mother with a knife Mumbai Crime News)
नेमकं काय आहे प्रकरण?
मृत Girlfriend ही बुधवारी सकाळी पावणे दहाच्या सुमारास आईसह घरात होती. त्यावेळी तिचा बॉयफ्रेंड सुरेश वाडेकरही होता. सकाळपासून पाऊस चालू होता, त्यावेळी आरोपी सुरेश त्याच्या Girlfriend ला बोलला की, माझ्या घरी चल आपण तिथेच राहू. मात्र आता पाऊस आहे त्यामुळे आपण पाऊस उघडला की जाऊयात. (Boyfriend Attacked Girlfriend and Her Mother)
सुरेशचा स्वभाव हा सनकी असल्यामुळे त्याला Girlfriend नंतर जाऊ म्हणाली याचा त्याला राग आला. तो किचनमध्ये गेला आणि Girlfriend वर हल्ला केला. मुलीला वाचवण्यासाठी तिची आई मध्ये आली. मात्र सनकी सुरेशने कोणताही मागचा पुढचा विचार न करता मुलीच्या आईवरही चाकूने प्राणघातक हल्ला केला. (Mumbai Crime News)
Girlfriend आणि तिची आई जखमी अवस्थेत होते. सुरेशने हल्ला केल्यानंतर आजूबाजूचे लोक गोळा झाले त्यानंतर त्यांनी दोघींना रूग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. दोघींनी सुरेश विरोधात तक्रार दाखल केली, पोलिसांनी आयपीसी कलम 326 कलमांतर्गत गुन्हा दाखल केला असून त्याला ताब्यात घेतलं आहे.