Breaking : ताजमहल बॉम्बने उडवून टाकण्याच्या धमकीने एकच खळबळ

जगप्रसिद्ध पर्यटन स्थळ ताजमहल बॉम्बने उडवून टाकण्याच्या धमकीचा फोन आल्याने एकच खळबळ उडाली होती.

Updated: Mar 4, 2021, 12:10 PM IST
Breaking : ताजमहल बॉम्बने उडवून टाकण्याच्या धमकीने एकच खळबळ

आग्रा : जगप्रसिद्ध पर्यटन स्थळ ताजमहल बॉम्बने उडवून टाकण्याच्या धमकीचा फोन आल्याने एकच खळबळ उडाली होती.

आयएसएफच्या जवानांनी सर्व पर्यटकांना ताजमहलमधून बाहेर काढत परिसर रिकामा करण्यात आला होता. परिसर सध्या सुरक्षा रक्षकांनी ताब्यात घेतला आणि त्याठिकाणी सर्च ऑपरेशन सुरू केले.  

ताजमहालमध्ये बॉम्ब ठेवल्याची माहिती मिळाल्याने पर्यटकांमध्ये भीती पसरली होती. सुरक्षा रक्षकांनी बहुतांष पर्यटकांना सुरक्षित बाहेर काढल्याची माहिती समोर आली आहे. ताज महालमध्ये सुरक्षा रक्षकांकडून मॉक ड्रिल करण्यात आल्याची माहिती पोलीसांकडून देण्यात आल्याने सर्वांनी सुटकेचा श्वास सोडला.

दरम्यान, ताजमहल बॉम्बने उडवून टाकल्याचा फोन 112 क्रमांकवर आल्याची माहिती आग्रा पोलिसांनीच ट्विटरवरून दिली दिली. परंतु पर्यटकांना आपत्कालीन परिस्थितीत बाहेर काढण्याचे आणि बॉम्ब सर्च ऑपरेशनचे मॉकड्रील घेण्यात आल्याच़ेही नंतर स्पष्ट करण्यात आले.