Bride Groom Video : लग्न समारंभाचा एक व्हिडिओ इंटरनेटवर जोरदार व्हायरल होत आहे. नववधु आणि वर एकमेकांना वरमाला घालणार असतात. एव्हढ्यात एक धक्कादायक घटना घडते. होणाऱ्या नवऱ्याची अवस्था पाहून नववधू किंचाळली आणि उपस्थितांचे लक्ष तिकडे गेले. याचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर शेअर करण्यात आला आहे. प्रत्येकजण रोज वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ पोस्ट करत असतो. काहींनी लग्नाच्या मिरवणुकीचे व्हिडिओ पोस्ट केले आहेत तर काहींनी लग्नाच्या दिवशी स्टेजवर वरमाला सोहळ्याचे व्हिडिओ पोस्ट केले आहेत. मात्र, असे काही भावनिक व्हिडिओही आहेत, जे पाहून लोक आपले अश्रू आवरु शकत नाहीत. येथे असाच एक व्हिडिओ आला आहे जो तुमचे हृदय पिळवटून टाकेल आणि तुम्हाला अशा प्रेमळ जीवन साथीदारासाठी प्रार्थना करायला लावेल.
भारतीय विवाहसोहळ्यातील एक अतिशय लोकप्रिय विधी म्हणजे वरमाला किंवा जयमाला समारंभ. यादरम्यान अशा अनेक घटना घडतात, ज्याचे लोक आश्चर्यचकित होतात. हिंदू परंपरेत, वधू आणि वर फुलांच्या हारांची देवाणघेवाण करतात. हा विधी त्यांच्या आयुष्याच्या जोडीदाराच्या स्वीकाराच्या वचनाचे आणि आयुष्यभर त्यांचा आदर करण्याच्या शपथेचे प्रतीक आहे. वर्माला सोहळ्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये वधू-वर एकमेकांना हार घालणार होते. व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये वधू-वर एकमेकांसमोर उभे राहून समारंभ सुरु होण्याची वाट पाहत आहेत. त्यावेळी, वधू पुष्पहार घेऊन पुढे जात असताना, अचानक वराच्या डोळ्यात किहितरी जाते आणि वर इतक्या ओरडतचे वेगाने तोंड फिरतो की, वधुला आधी कळतच नाही. ती त्यावेळी घाबरुन जाते. काय झालं, अशी चिंता तिच्या चेहऱ्यावर दिसते. त्यावेळी डोळ्यात किटक केल्याचे लक्षात येतात ती होणाऱ्या नवऱ्याला मदत करते. रुमाल घेऊन डोळ्यात गेलेले काढण्याच प्रयत्न करते.
नवरा मुलगा डोळ्यात गेल्याने झालेल्या वेदनेने ओरडू लागतो. यानंतर, कोणाचीही वाट न पाहता, वधू रुमाल घेऊन सर्वांसमोर वराच्या डोळ्यातील किटक काढू लागते. त्यानंतर ती वराचा चेहरा धरुन वेदना कमी करण्यासाठी डोळ्यांना फुंकर मारताना दिसते. वधूच्या या गोड स्वभावाने सर्वांनाच सुखद धक्का बसला. हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर व्हायरल होत आहे, itz_priynandan_00 या खात्याने शेअर केला आहे आणि त्याला 335K हून अधिक लोकांनी पसंती दिली आहे. हे 5.3 दशलक्षाहून अधिक वेळा पाहिले गेले आहे. एका यूजरने कमेंट केली की, "माझ्याकडे लग्नाचा आतापर्यंतचा सर्वोत्तम क्षण होता." दुसर्या यूजरने लिहिले, "अच्छे हमसफर."