Trending Video: स्कूल चलें हमsss, प्रत्येक भावा बहिणीने पाहावा असा व्हिडीओ!

Viral Video: लहान भावा बहिणीचे व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असतात. असाच एक क्यूट व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय.  

Updated: Nov 22, 2022, 01:01 AM IST
Trending Video: स्कूल चलें हमsss, प्रत्येक भावा बहिणीने पाहावा असा व्हिडीओ! title=
Brother Sister Video

Brother Sister Video: जगातील सर्वात सुंदर नातं म्हणजे भावा बहिणीचं नातं. लाडक्या भावासाठी बहिण किंवा लाडक्या बहिणीसाठी भाऊ काहीही करण्यास तयार असतो. अनेकांनी लहानपणीचे दिवस देखील आठवत असतील. लहान भावा बहिणीचे व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असतात. असाच एक क्यूट व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय.

काय आहे हा Video ?

व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये बहिण आणि भाऊ शाळेत जाताना दिसत आहेत. चालत नव्हे तर गाडीवर... अनेकदा तुम्ही तुमच्या बहिणीसोबत सायकलवर शाळेत गेला असाल किंवा शाळा जवळ असेल तर चालत. मात्र, हा पठ्ठ्या आपल्या बहिणीसोबत चक्क गाडीवर शाळेत जात असल्याचं पहायला मिळतंय.

आणखी वाचा -Video : दोन महिला जेव्हा कार पार्क करतात त्यानंतर पुढे जे होतं...

निळा शर्ट आणि निळी पॅन्ट असा गणवेळ आणि पाठीवर शाळेची बॅग घेऊन हे दोघे शाळेत निघालेत. अनेकदा घराजवळ शाळा नसल्याने शाळकरी मुलांना शाळेत जाण्यासाठी लांबचा प्रवास करावा लागतो. तसाच काहीसा प्रवास या दोन्ही मुलांना करावा लागतो. भावाचा गाडीचा स्टंट पाहून बहिणीला देखील हसू येतंय.

पाहा Video -

दरम्यान, व्हायरल झालेला हा व्हिडीओ ट्रोल देखील होताना दिसतोय. इतक्या लहान मुलांना गाडी चालवणं  चुकीचं असल्याचं अनेकांचं म्हणणं आहे. व्हिडिओला एक लाख 50 हजारांहून अधिक व्ह्यूज तर 7 हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात हा व्हिडीओ शेअर केला जात असल्याचं पहायला मिळतंय.