बीएसएफ जवानाचं वरिष्ठ अधिकाऱ्याच्या पत्नीसोबत घाणेरडं काम, नाश्ता देण्यासाठी घरी गेला अन्..

बीएसएफमध्ये कार्यरत असिस्टंट कमांडंटच्या पत्नीवर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. विवाहितेने आरोपी बीएसएफ जवानाविरुद्ध महिला पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

Updated: Mar 30, 2022, 10:50 AM IST
बीएसएफ जवानाचं वरिष्ठ अधिकाऱ्याच्या पत्नीसोबत घाणेरडं काम, नाश्ता देण्यासाठी घरी गेला अन्.. title=
प्रतिकात्मक फोटो

बाडमेर : सीमावर्ती जिल्ह्यातील जालीपा बीएसएफमध्ये कार्यरत असिस्टंट कमांडंटच्या पत्नीवर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. विवाहितेने आरोपी बीएसएफ जवानाविरुद्ध महिला पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. ही घटना १० मार्च रोजी घडली. पोलिसांनी त्वरित कारवाई करत आरोपी बीएसएफ जवान कोसर एसके याला अटक केली.

27 वर्षीय महिला आपल्या पतीसोबत जालीपा बीएसएफमध्ये राहत असल्याची माहिती मिळत आहे. आरोपी पीडित महिलेच्या घरी अधुनमधून जात असे. आरोपी जवान कोसर एसके याने विवाहितेला नाश्ता देण्याच्या बहाण्याने घरात घुसून विवाहितेवर बलात्कार केला.

पीडितेने तिच्या पतीसह महिला पोलीस ठाणे गाठून आरोपी जवानाविरुद्ध गुन्हा दाखल केला. पोलिसांनी ३७६ आयपीसी, ३(२), एससी-एसटी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर पोलिसांनी आरोपी बीएसएफ जवान कोसर एसके याला अटक करून चौकशी सुरू केली.