Income Tax : कर भरताना चूक झाली तर !, सरकारने केली ही नवी व्यवस्था

Budget 2022 Income Tax Latest Update: तुम्ही इन्कम टॅक्स (Income tax) भरताना काही चूक झाली तर तुम्हाला ती माफ नव्हती. मात्र, आता तुम्हाला सूट मिळणार आहे. 

Updated: Feb 1, 2022, 02:52 PM IST
Income Tax : कर भरताना चूक झाली तर !, सरकारने केली ही नवी व्यवस्था  title=

मुंबई : Budget 2022 Income Tax Latest Update: तुम्ही इन्कम टॅक्स (Income tax) भरताना काही चूक झाली तर तुम्हाला ती माफ नव्हती. मात्र, आता तुम्हाला सूट मिळणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत अर्थसंकल्पादरम्यान ITR मधील त्रुटी सुधारण्यासाठी 2 वर्षांपर्यंत मुदत देण्याची घोषणा केली. आयटीआरमध्ये खोटेपणा केल्यास दोन वर्षांपर्यंतच्या तुरुंगवासाची तरतूदही सरकारने केली आहे.

 Budget : काय महाग आणि काय स्वस्त, जाणून घ्या

 अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर करताना अनेक मोठ्या घोषणा केल्या. त्यांना सांगितले की, ITR मधील त्रुटी सुधारण्यासाठी  दोन वर्षांपर्यंतचा कालावधी दिला जाईल. तसेच कॉर्पोरेट टॅक्स 18 टक्क्यांवरुन 15 टक्के करण्यात आला आहे.

आयटीआरमध्ये चुकीचे काम केल्यास तुरुंगवास

संसदेत सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्र्यांनी सांगितले की, कर प्रणालीत सुधारणा करण्याची प्रक्रिया सुरुच राहील.  नवीन कर सुधारणा आणण्याचा सरकारचा विचार आहे. आयटीआरमध्ये खोटेपणा केल्यास दोन वर्षांपर्यंतच्या तुरुंगवासाची तरतूदही सरकारने केली आहे.

Budget : इन्कम टॅक्समध्ये कोणताही बदल नाही

2 वर्षांसाठी अद्ययावत रिटर्न दाखल करा

करदात्यांना थोडासा दिलासा देण्याचा प्रयत्न झाला आहे. करदात्यांना अद्ययावत आयटीआर दाखल करण्याची तरतूद करण्यात आली आहे. करदाते कोणत्याही मूल्यांकन वर्षाच्या शेवटच्या दिवसापासून पुढील दोन वर्षांसाठी अद्यतनित रिटर्न भरु शकतात. म्हणजेच, जर तुम्ही 2022-23चे रिटर्न भरले असेल आणि त्यात काही बदल करायचे असतील तर या अपडेटेड रिटर्नसाठी 2024-25 पर्यंत भरता येईल.

कर्मचार्‍यांसाठी एनपीएस कर सूट वाढली

याशिवाय, अर्थमंत्र्यांनी सांगितले की, आता एनपीएसमध्ये 10 टक्क्यांऐवजी 14 टक्के योगदान दिले जाईल. म्हणजेच सरकारी कर्मचार्‍यांसाठी एनपीएस योजनेत करमाफीची व्याप्ती वाढवण्यात आली आहे. यासोबतच नवीन कर सुधारणा आणण्याची योजना अर्थमंत्र्यांनी जाहीर केली. कर्मचाऱ्यांना पेन्शनवरही कर सूट मिळणार आहे. त्याच वेळी, NPS मध्ये केंद्र आणि राज्याचे योगदान आता 14 टक्के असणार आहे.