तिरुपती बालाजी देवस्थानाचं इतक्या कोटींचं बजेट मंजुर

देशातील सर्वात श्रीमंत मंदिर तिरुपती बालाजी देवस्थानाने नुकतंच आपलं बजेट मंजूर केलं आहे.

Updated: Mar 1, 2021, 08:24 PM IST
तिरुपती बालाजी देवस्थानाचं इतक्या कोटींचं बजेट मंजुर title=

मुंबई : देशातील सर्वात श्रीमंत मंदिर तिरुपती बालाजी देवस्थानाने नुकतंच आपलं बजेट मंजूर केलं आहे. सर्वात श्रीमंत मंदिर असलेल्या तिरुपती देवस्थानच्या 2 हजार 937 कोटींच्या बजेटला नुकतीच मंजुरी देण्यात आली.  या मंदिराला 2020-21 या आर्थिक वर्षांत दानपेटीतून १ हजार ११३१ कोटी रुपयांची कमाई होईल, असा अंदाज आहे. मंदिराला व्याजातून 533 कोटींची, प्रसादामधून 375 कोटींची, तर दर्शनाच्या माध्यमातून 210 कोटी रुपयांची कमाई होणार आहे.

अयोध्या, मुंबई, जम्मूत उभारणार भजन मंदिरं

अयोध्येत राम मंदिर निर्माण ट्रस्टनं जमीन दिली तर त्याठिकाणी भजन मंदिर किंवा सुविधा केंद्र निर्माण करण्याचा संकल्प तिरुपती देवस्थाननं केलाय. त्याशिवाय मुंबई आणि जम्मूमध्ये उभारण्यात येणाऱ्या भजन मंदिरांचं भूमिपूजन लवकरच केलं जाईल, असं तिरुपती देवस्थान ट्रस्टनं स्पष्ट केलं आहे.

गायीला राष्ट्रीय प्राण्याचा दर्जा

दरम्यान, गायीला राष्ट्रीय प्राण्याचा दर्जा देण्याची घोषणा तिरुपती देवस्थाननं केली आहे. केंद्र सरकारनं देखील अशी घोषणा करावी, अशी शिफारस करण्यात आली आहे. देवस्थानमार्फत चालवण्यात येणाऱ्या सहा वेद पाठशाळांचं श्री वेंकटेश्वर वेद विज्ञान पीठम असं नामांतर करण्याचा प्रस्तावही यावेळी मंजूर करण्यात आला.