लग्नसराईत आनंदाची बातमी, सोनं-चांदीच्या दरात घसरण

लग्नसराईचा काळ सुरु असून सोनं-चांदीची मोठ्या प्रमाणात खरेदी होत आहे. तुम्हीही सोनं-चांदी खरेदी करण्याचा विचार करत आहात तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण, सोनं आणि चांदीच्या दरात घसरण झाली आहे.

Sunil Desale Sunil Desale | Updated: Feb 25, 2018, 04:43 PM IST
लग्नसराईत आनंदाची बातमी, सोनं-चांदीच्या दरात घसरण title=
Representative Image

नवी दिल्ली : लग्नसराईचा काळ सुरु असून सोनं-चांदीची मोठ्या प्रमाणात खरेदी होत आहे. तुम्हीही सोनं-चांदी खरेदी करण्याचा विचार करत आहात तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण, सोनं आणि चांदीच्या दरात घसरण झाली आहे.

सोनं-चांदीच्या दरात घट

जागतिक स्तरावर सोन्याची मागणी कमी झाल्याने दरात घट झाली आहे. पाहूयात सोनं आणि चांदीचे सध्याचे काय दर आहेत.

सोन्याच्या दरात घसरण

सोन्याच्या दरात १७० रुपयांनी घट झाल्याने सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ३१,५८० रुपयांवर पोहोचला आहे. त्यासोबतच चांदीच्या दरातही घसरण झाल्याचं पहायला मिळत आहे.

चांदीचा दरही घसरला

सोन्याच्या किंमतीसोबतच चांदीच्या दरातही घट झाली आहे. चांदीच्या दरात घट झाल्याने चांदीचा दर ३९,४७५ रुपये प्रति किलोग्रॅम झाला आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोन्याच्या दरात घट झाल्याने तो १३२८.२० डॉलर प्रति औन्स झाला आहे. तर, चांदीमध्येही घट झाल्याने १६.५० डॉलर प्रति औन्स झाला आहे. यासोबतच स्थानिक बाजार आणि ज्वेलर्सकडून होणाऱ्या मागणीत घट झाल्याचं दिसत आहे. 

राजधानी दिल्लीत ९९.९ टक्के आणि ९९.५ टक्के शुद्धता असलेल्या सोन्याच्या दरात १७०-१७० रुपयांनी घट झाली आहे. त्यामुळे सोन्याचा दर क्रमश: ३१,५८० रुपये आणि ३१,४३० रुपये प्रति दहा ग्रॅमवर पोहोचला आहे.