Business Idea | 50 हजार रुपयांमध्ये सुरू करा 'हा' व्यवसाय; अफाट कमाईची संधी

 स्वतःचा व्यवसाय सुरू करणे हे प्रत्येक व्यक्तीचं स्वप्न असते. काही लोक आपल्या नोकरीवर समाधानी नसताना मजबुरीने काम करतात. कदाचित तुमच्या बाबतीतही असेच असेल

Updated: Apr 22, 2022, 01:24 PM IST
Business Idea | 50 हजार रुपयांमध्ये सुरू करा 'हा' व्यवसाय; अफाट कमाईची संधी title=

मुंबई : स्वतःचा व्यवसाय सुरू करणे हे प्रत्येक व्यक्तीचं स्वप्न असते. काही लोक आपल्या नोकरीवर समाधानी नसताना मजबुरीने काम करतात. कदाचित तुमच्या बाबतीतही असेच असेल. तुम्हालाही व्यवसाय सुरू करायचा असेल, तर आम्ही तुम्हाला अगदी कमी खर्चात सुरू होणाऱ्या व्यवसायाबद्दल सांगणार आहोत.

50 हजारांपासून हा व्यवसाय सुरू 

50 हजार से शुरू होगा यह ब‍िजनेस

या व्यवसायातून तुम्ही चांगली कमाई करू शकता. आम्ही ज्या व्यवसायाबद्दल बोलत आहोत ती म्हणजे एलईडी बल्ब बनवण्याचा व्यवसाय. जर जागेची कमतरता असेल तर तुम्ही ती तुमच्या घरातही सुरू करू शकता. फक्त 50 हजार रुपये गुंतवून हा व्यवसाय सुरू करता येतो.

शासन अनुदान

सब्सिडी भी देती है सरकार

सरकारकडून हा व्यवसाय करण्यास प्रोत्साहन दिले जाते. या व्यवसायासाठी शासनाकडून अनुदान उपलब्ध आहे. अशा परिस्थितीत तुम्हाला जास्तीत जास्त 50 हजार रुपये गुंतवावे लागतील.

दररोज कमाई

रोज होगी इतनी कमाई

एक एलईडी बल्ब बनवण्यासाठी 40 ते 50 रुपये खर्च येतो. हा बल्ब बाजारात 80 ते 100 रुपयांना सहज विकता येतो. तुम्ही छोट्या प्रमाणावर काम सुरू केले आहे. अशा परिस्थितीत समजा तुम्ही दररोज 100 बल्ब विकले तर तुम्हाला 4 ते 5 हजारांचे उत्पन्न मिळेल.

कंपन्यांकडून प्रशिक्षण

कंपनियां देती हैं ट्रेनिंग

अनेक सरकारमान्य संस्था एलईडी बल्ब कसे बनवायचे याचे प्रशिक्षण देतात. एलईडी बल्ब बनवणाऱ्या कंपन्या प्रशिक्षणही देतात. 

सतत वाढणारी मागणी

शहरात आणि गावात एलईडी बल्बची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. एलईडी बल्बमुळे विजही कमी लागते. प्लॅस्टिकचा बनलेला असल्याने हा बल्ब टिकाऊ राहतो.