Business at Home: गृहिणींनो लक्ष द्या! घरबसल्या बिझनेस करून कमवा लाखो रूपये

Business Ideas: महिला आता सर्वच क्षेत्रात आघाडीच्या आहात त्यामुळे त्यांनाही मोठ्या संधी उपलब्ध झाल्या (Oppourtunity for Women) आहेत. परंतु गृहिणींसाठी आता चांगल्या बिझनेस आयडिया विकसित होत आहेत. युट्यूबर (Youtuber) होण्यापर्यंत सगळ्यांनी आपल्या कक्षा विस्तारल्या आहेत तेव्हा जाणून घेऊया की गृहिणी कशा प्रकारे आपलाही बिझनेस घरच्या (Business at Home) घरी सुरू करू शकतात. 

Updated: Mar 9, 2023, 12:38 PM IST
Business at Home: गृहिणींनो लक्ष द्या! घरबसल्या बिझनेस करून कमवा लाखो रूपये  title=
business ideas at home see how you can start your own business at home for women read the full article

Business Ideas For HomeMakers: नुकताच आपण सर्वांनी महिला दिन (Women's Day) जल्लोषात साजरा केला. महिला या आता कमावत्या असल्या तरीसुद्धा अशा अनेक महिला आपल्या आजूबाजूला आढळतील ज्या गृहिणी आहेत. गृहिणी या आपल्या घरचं सगळं काम पाहतात, कुटुंबाचे नियोजन करतात आणि सर्व कुटुंबियांची काळजी घेतात परंतु गृहिणी (HomeMaker) ही फक्त घरापुरतीच मर्यादित असते. आपल्या कामाचा पगार मात्र त्यांना मिळत नाही. गृहिणींना मात्र आपल्या कामाचा पगार काही मिळत नाही. त्यामुळे त्यांच्यासाठी कमाईचे साधन काय, असा प्रश्न विचाराल तर ते काहीच नसते. त्यामुळे आपल्या घरातील प्रत्येक गृहिणीही या कार्यक्षम व्हाव्यात आणि त्यांनाही काहीतरी कमाईचे (Small Business Ideas For Women) साधन मिळावे यासाठी विशेष करून गृहिणींसाठी बिझनेस आयडियाही विकसित होत आहेत. (business ideas at home see how you can start your own business at home for women read the full article)

सध्या अशीच एक बिझनेस आयडिया तुम्ही डेव्हप करू शकता. तुम्ही घराचा बराच वेळ हा घरीच घालवत असाल तर तुम्ही घरी बसल्या बसल्याही या बिझनेसची जोरात तयारी करू शकता. तेव्हा जाणून घ्या की तुम्ही घरी बसल्या बसल्या कसा काय एक स्ट्रेटेजिक बिझनेस (Strategic Business) तयार करू शकता. सध्या वर्क फ्रॉम होमचा (Work From Home) जमाना आहे त्यामुळे तुम्हाला घरच्या घरीही अनेक प्रकारे नवीनतम बिझनेस सुरू करण्याची प्रेरणा मिळू शकते. तुम्ही घरबसल्या आपल्या कामाची आखणी करू शकता. त्यातून तुम्हाला जर का वाटतं असेल तर तुम्ही घरच्या घरी ऑफिससारखा सेटअपही करून घेऊ शकता. परंतु यासाठी तुमच्या बिझनेसचं नक्की स्वरूप कसं आहे हेही लक्षात घेता येईल आणि त्यानुसार तुम्ही घरच्या घरी ते सेटअप (Business Setup) करून घेऊ शकता. 

फिटनेस फ्रिक आहात मग सुरू करा घरच्या घरी योगासनं (Yoga)

तुम्हाला यासाठी काही सेर्टिफिकेट कोर्सेस (Certificate Courses) करावे लागतील. त्यातून तुम्ही अशी योगासनं शिकून लोकांना ती शिकवू शकता. तेव्हा अशावेळी लक्षात घ्या की तुम्हालाही ट्रेनिंग देण्यासाठी ट्रेनिंग देणंही महत्त्वाचे आहे. यात तुम्हाला चांगला बिझनेसही करता येऊ शकतो. 

ब्युटी पार्लरचा बिझनेस (Beauty Parlour)

तुम्हाला जरा का ब्युटीपार्लरचा बिझनेस सुरू करायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला काही प्रमाणात खर्च अंगाशी घ्यावा लागेल. त्यातून सर्व साहित्यांचा खर्च तुमच्यासाठी महत्त्वाचा राहिल. त्याचसोबत तुम्हाला घरात एक रूम त्यानुसार सेट करून तिथे काही गोष्टींचा सेटअपही करावा लागेल. यासाठी तुम्हाला ट्रेनिंगसोबतच (Business Training) बिझनेस सेट करण्यासाठी मार्गदर्शन घ्यावे लागेल परंतु यातूनही तुम्ही घरच्या घरी तुमच्या कस्टमरला घरी बनवू शकता. 

केक बनवण्याचा बिझनेस (Cake Making)

सध्या कलिनरी आर्ट्समध्ये करिअर काय बिझनेस करणाऱ्यांनाही आपण पाहतो आहे. केक बनवून तुम्ही घरच्या घरीही विकू शकता. त्यासाठी फक्त तुम्हाला योग्य मार्केटिंग (Marketing) करावे लागले एकदा का तुम्हा योग्य ते मार्केटिंग केलेत तर तुमच्यासाठी ते फार फायद्याचे ठरू शकते. यासाठी तुमच्या पाककौशल्याचा आणि तुमच्या क्रिएटिव्हीटी आणि इव्होवेशनचा वापर करू शकता. 

शिवणकामाचा बिझनेस (Tailoring)

तुम्हाला घरच्या घरी टेलरिंग (Home Tailoring) किंवा शिवणकामाचाही बिझनेस करता येऊ शकतो. यासाठी तुम्हाला तुमचे काही एक्विमेंट्स ठेवणं महत्त्वाचे आहे. तुम्ही या बिझनेसमधून मोठी कमाई करू शकता. यात तुमच्या कलासक्त वृत्तीला चालना मिळू शकते.