DA Increase | सरकारी कर्मचाऱ्यांची दिवाळी जोरात; महागाई भत्त्यात वाढ केल्याची मोठी घोषणा

केंद्र सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. सरकारने दिवाळीच्या आधी केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 3 टक्क्यांनी वाढ केली आहे.

Updated: Oct 21, 2021, 03:59 PM IST
DA Increase | सरकारी कर्मचाऱ्यांची दिवाळी जोरात; महागाई भत्त्यात वाढ केल्याची मोठी घोषणा

नवी दिल्ली : केंद्र सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. सरकारने दिवाळीच्या आधी केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 3 टक्क्यांनी वाढ केली आहे. म्हणजेच महागाई भत्ता 31 टक्के इतका मिळणार आहे. त्याचा फायदा एक कोटीहून अधिक केंद्रीय कर्मचाऱ्यांना आणि पेंशनधारकांना मिळणार आहे. 

1 जुलैपासून लागू होणार घोषणा
केंद्र सरकारने घोषणा केली की, महागाई भत्त्यामध्ये पुन्हा 3 टक्क्य़ांची वाढ करण्यात आली आहे. सरकारने याआधी हा भत्ता 11 टक्क्यांनी वाढवून 28 टक्के केला होता. नुकताच जारी करण्यात आलेला महागाई भत्ता 1 जुलै पासून लागू करण्यात येणार आहे. 

सरकारने केली घोषणा 
श्रम मंत्रालयाने जून, जुलै आणि ऑगस्टमध्ये All India Consumer Price Index (AICPI)चे आकडे जारी केले आहे. ऑगस्टमध्ये जारी करण्यात आलेल्या इंडेक्स 123 अंकांवर पोहचला आहे. याच आधारावर केंद्र सरकार कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय घेते.